Spread the news

कोल्हापूर जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ना. श्री. प्रकाशजी आबिटकर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ऊन-पावसाची तमा न बाळगता अहोरात्र राबणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्चता कर्मचाऱ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज रेनकोटचे वाटप करण्यात आले.
यापूर्वी मार्च महिन्यातही आपण महापालिकेच्या अंदाजे ४,००० कर्मचाऱ्यांना उन्हापासून संरक्षणासाठी कॅप्स (टोप्या) दिल्या होत्या. त्याच सातत्यातून आज पावसाळ्यात त्यांचे आरोग्य व सुरक्षा जपण्यासाठी हा लहानसा प्रामाणिक प्रयत्न केला.
शहराच्या स्वच्छतेचा कणा असलेल्या आमच्या या सर्व कष्टकरी बांधवांच्या पाठीशी आम्ही नेहमीच खंबीरपणे उभे आहोत!
याप्रसंगी मनपा उप आयुक्त श्री. पारितोष कंकल साहेब, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. जयंत पवार, कर निर्धारक व संग्राहक (Tax Officer) श्री. सुधाकर चाल्लवाड साहेब, सामाजिक कार्यकर्ते दीपक बराले, आशपाक आजरेकर, विक्रम कांबळे, सॅनिटरी इन्स्पेक्टर मनोज लोट, वॉर्ड मुकादम मेहरुद्दीन शेख, कुलदीप कांबळे, अमोल बुचडे यांच्यासह १०० हून अधिक आरोग्य व स्वच्चता कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आश्किन गणी आजरेकर
(नगरसेवक – कोल्हापूर महानगरपालिका)
#KMCWorkers #RaincoatDistribution #MonsoonSafety #Kolhapur #AashqinAjrekar

Spread the news

You may also like

error: Content is protected !!