शाहू’च्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत सलग चाळीसाव्यावर्षी रंगणार कुस्तीचा थरार-राजे समरजितसिंह घाटगे शाहू जयंतीनिमित्तऑलिम्पिकच्या धर्तीवर २४ ते२७ ऑगस्टदरम्यान स्पर्धा

Spread the news

*’शाहू’च्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत सलग चाळीसाव्यावर्षी रंगणार कुस्तीचा थरार-राजे समरजितसिंह घाटगे*

­

 

*शाहू जयंतीनिमित्तऑलिम्पिकच्या धर्तीवर २४ ते२७ ऑगस्टदरम्यान स्पर्धा*

  •  

कागल, प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील होतकरू मल्लांना कुस्तीचे अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळावी.त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे,या उद्देशाने श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत सोमवार (ता.२४) ते गुरुवार (ता.२७) या कालावधीत मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित होणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे ४० वे वर्ष आहे. कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही कुस्ती परंपरा आजही अखंडपणे सुरू असल्याची माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते
ग्रामीण भागातील मल्लांना मॅटवरील कुस्तीचा सराव व्हावा, आधुनिक तंत्रज्ञान व आंतरराष्ट्रीय नियमांची माहिती मिळावी आणि त्याचा प्रत्यक्ष स्पर्धेत उपयोग करता यावा, या हेतूने ही स्पर्धा ऑलिम्पिक पद्धतीने व आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार घेण्यात येते. या स्पर्धेतून अनेक मल्लांना राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांसाठी उपयुक्त अनुभव मिळाला आहे.
ही स्पर्धा शाहू कारखाना कार्यक्षेत्रातील कागल,करवीर व हातकणंगले तालुके, उर्वरित कागल तालुका,गडहिंग्लज शहर तसेच उत्तूर आणि कडगाव-कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघ या क्षेत्रापुरती मर्यादित राहणार आहे.
बालगटातील स्पर्धकांची नावनोंदणी व वजन सोमवार (ता. २४) सकाळी ८.३० वाजता, कुमार व ज्युनिअर गटातील स्पर्धकांची नोंदणी व वजन मंगळवार (ता. २५), तर महिला व सीनियर पुरुष गटातील स्पर्धकांची नोंदणी व वजन बुधवार (ता. २६) रोजी सकाळी ८.३० वाजता कारखाना साईटवर होणार आहे.
प्रथम व द्वितीय क्रमांकासाठीच्या लढती वगळता अन्य सर्व लढती संबंधित दिवशीच घेण्यात येतील. सर्व गटांतील अंतिम लढती गुरुवार (ता. २७) रोजी सकाळी होतील. प्रत्येक वजनी गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम,पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मल्लांनी नियम व अटींची माहिती घेऊन संयोजकांशी संपर्क साधून आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.’महाखेल स्पोर्टस् पुणे कुस्ती हेच जीवन’ या फेसबुक पेजवरून कुस्तीप्रेमींना घरबसल्या स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे.

चौकट
३८ विविध वजनी गटांत स्पर्धा

यंदाच्या स्पर्धेत विविध ३८ वजनी गटांत मल्लांना आपले कौशल्य दाखविता येणार आहे. चौदा वर्षांखालील बालगटात आठ, सोळा वर्षांखालील कुमार गटात आठ, एकोणीस वर्षांखालील ज्युनिअर गटात सात आणि सीनियर पुरुष गटात पाच वजनी गट असतील. महिला कुस्तीगीरांसाठी २२ ते ७६ किलो वजनाच्या विविध दहा गटांत स्पर्धा होणार आहेत.

या बातमीत छत्रपती शाहू महाराज व स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांचे फोटो वापरावेत


Spread the news

You may also like

error: Content is protected !!