वकिलांच्या सुरक्षेसाठी विधेयक मांडल्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांचे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे आभार

Spread the news

*वकिलांच्या सुरक्षेसाठी विधेयक मांडल्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांचे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे आभार*

­

 

कोल्हापूर दि. १९ :
राज्यातील वकिलांच्या सुरक्षिततेसाठी विधिमंडळात महत्त्वपूर्ण विधेयक मांडल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने प्रत्यक्ष भेट घेऊन जाहीर आभार मानण्यात आले. वकिलांवर होणारे हल्ले आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, विधिमंडळात या संदर्भातील आवाज उठवल्याबद्दल वकिलांनी आमदार क्षीरसागर यांचे विशेष कौतुक केले.

  •  

याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि प्रमुख वकीलांची उपस्थिती होती. यामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मंडलिक, उपाध्यक्ष ॲड. संजय घाटगे, माजी अध्यक्ष ॲड. व्ही. आर. पाटील आणि ॲड. आर. एल. चव्हाण यांचा प्रामुख्याने समावेश होता.

तसेच जिल्हा बार असोसिएशनचे सहसचिव ॲड. अवधुत पाटील, स्टेट यंग लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. चेतन शिंदे, उपाध्यक्ष ॲड. अभिषेक देवकर, लोकल ऑडीटर ॲड. सर्वेश भांदिगरे आणि कार्यकारिणी सदस्य ॲड. वैभव गोरडे या प्रसंगी उपस्थित होते. या शिष्टमंडळाने आमदार राजेश क्षीरसागर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वकिलांच्या सुरक्षेचा कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!