​मुख्यमंत्री ‘देवाभाऊ’ यांच्या वाढदिवसानिमित्त जनसुराज्य शक्ती पक्षाचा अनोखा उपक्रम; पंढरपूरमधील वारकऱ्यांसाठी १ लाख पाण्याचे बॉटल्स आणि १ लाख राजगिरा लाडू रवाना

Spread the news

​मुख्यमंत्री ‘देवाभाऊ’ यांच्या वाढदिवसानिमित्त जनसुराज्य शक्ती पक्षाचा अनोखा उपक्रम; पंढरपूरमधील वारकऱ्यांसाठी १ लाख पाण्याचे बॉटल्स आणि १ लाख राजगिरा लाडू रवाना
​मिरज:
आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्यासाठी पंढरपूरकडे लाखोच्या संख्येने मार्गस्थ झालेल्या वारकरी भाविकांच्या सेवेसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाने एक स्तुत्य आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री ‘देवाभाऊ’ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी १ लाख स्वच्छ पाण्याच्या बॉटल्स आणि १ लाख राजगिरा लाडू भरलेला आयशर टेम्पो आज मिरजेतून पंढरपूरकडे रवाना करण्यात आला.
​”पांडुरंगाच्या भेटीला येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हीच खरी पांडुरंगाची सेवा” हा पवित्र संदेश देत जनसुराज्य शक्ती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
​आज मिरज येथे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या हस्ते या मदत साहित्याने भरलेल्या आयशर टेम्पोचे भाविक वातावरणात पूजन करण्यात आले व त्याला पंढरपूरकडे हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. आषाढी वारीच्या काळात भाविकांची पाण्यासाठी व फराळासाठी गैरसोय होऊ नये, या उद्देशाने हा अनोखा सेवा यज्ञ राबवला जात आहे.
​याप्रसंगी जनसुराज्य शक्ती पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी, शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे,आप्पा पुजारी,अरविंद पाटील. पवन बंगले,विशाल पडळकर. मोहसीन जमादार, शहराध्यक्ष योगेश दरवंदर प्रणित पाटील. कीर्तीकुमार सावलवाडे, माणिक तोडकर पवन बंगले गिरीश नलवडे मोहन पाटील विकी गोसावी धनराज ताटे उमेश आवटी. शुभम वाघमारे. ओंकार जाधव. सुशांत काळे. शिवाजी महाडिक, नानासाहेब घोरपडे. मनोज पाटील,यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या या संवेदनशील आणि वारकरीभिमुख उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!