एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील ‘ओपन ऑटोमेशन चॅलेंज’चे यशस्वी आयोजन

Spread the news

एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील ‘ओपन ऑटोमेशन चॅलेंजचे यशस्वी आयोजन

पुणे : ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या (AISSMS) अभियांत्रिकी महाविद्यालयातील रोबोटिक्स अँड ऑटोमेशन अभियांत्रिकी विभागातर्फे बी अँड आर इंडस्ट्रियल ऑटोमेशन यांच्या सहकार्याने राष्ट्रीय स्तरावरील ओपन ऑटोमेशन चॅलेंज’ या तांत्रिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष समस्यांवर नाविन्यपूर्ण व तांत्रिक उपाय सादर करण्याची उत्कृष्ट संधी उपलब्ध झाली.

­

 

कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बी अँड आर इंडस्ट्रियल ऑटोमेशनच्या भारत सिंगापूर विभागाच्या मानव संसाधन प्रमुख श्रीमती अर्चना अमरनाथ उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना जागतिक उद्योगविश्वातील संधी, उद्योगांच्या अपेक्षा, विविधता व सर्वसमावेशकता, सांघिक कार्यपद्धती तसेच शाश्वत अभियांत्रिकी या विषयांवर मार्गदर्शन केले.

  •  

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमणे तसेच रोबोटिक्स अँड ऑटोमेशन अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. पी. एस. गज्जल यांनी विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण विचारसरणी, संशोधनवृत्ती आणि उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करण्याचे आवाहन केले.

स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक ऑटोमेशन प्रकल्प सादर करत आपल्या तांत्रिक ज्ञान, सर्जनशीलता आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेचे प्रभावी प्रदर्शन केले. स्पर्धेतील विजेता, उपविजेता आणि द्वितीय उपविजेता संघांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

एआयएसएसएमएस संस्थेचे मानद सचिव श्री. मालोजीराजे छत्रपती यांनी या उपक्रमाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करत सांगितले की, उद्योगसंस्थांच्या सहकार्याने आयोजित असे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण विचारांना चालना देतात, त्यांची व्यावहारिक कौशल्ये विकसित करतात आणि त्यांना जागतिक स्तरावरील करिअरसाठी सक्षम बनवतात.”

या स्पर्धेचे यशस्वी आयोजन श्री. एस. एन. चिवंडे (प्राध्यापक समन्वयक) यांनी बी अँड आर इंडस्ट्रियल ऑटोमेशनचे श्री. रजत जाधव यांच्या सहकार्याने केले. तसेच रोबोटिक्स अँड ऑटोमेशन विभागातील विद्यार्थी स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मोलाचे योगदान दिले.

याप्रसंगी एआयएसएसएमएस संस्थेचे मानद सहसचिव श्री. सुरेश प्रताप शिंदे, मानद कोषाध्यक्ष श्री. अजय पाटील तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भगवानराव बाबुराव साळुंखे यांनी आयोजकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण व प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या अशा उपक्रमांचे कौतुक केले.

सध्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिपत्याखाली स्वायत्त (Autonomous) दर्जा, ‘+’ मानांकन प्राप्त NAAC मान्यता, NBA मान्यताप्राप्त अभ्यासक्रम, उत्कृष्ट प्लेसमेंट, आधुनिक प्रयोगशाळा, संशोधन नवोपक्रमाला चालना देणारे वातावरण तसेच देशविदेशातील उद्योगांशी भक्कम सहकार्य यांमुळे एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय हे गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची प्रथम पसंती ठरत आहे. अशा उद्योग-सहभागातून आयोजित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान, व्यावहारिक कौशल्ये आणि जागतिक स्तरावरील करिअरच्या संधी प्राप्त होत असून, भविष्यकालीन अभियंते घडविण्याच्या महाविद्यालयाच्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा प्रचिती आली.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!