एस. एस. पी. एम. डे स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये हरिनामाचा गजर
एस एस पी एम डे स्कूल व जूनियर कॉलेज मध्ये पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या प्राचार्या कु. शिवाली जगताप व पर्यवेक्षिका सौ. रजनी नायर यांच्या हस्ते पालखी पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर विद्यार्थ्यांनी सुंदर भजन गायन नामघोष व भक्ती रसपूर्ण सुंदर नृत्याविष्कार सादर केले. त्यानंतर विद्यालय परिसरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी सुंदर रिंगण सादर केले. अनेक विद्यार्थ्यांनी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या तर अनेक विद्यार्थी वारकरी झाले होते. या कार्यक्रमासाठी सहभागी विद्यार्थ्यांचे पालक, आजी ,आजोबा उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजरात दुमदुमला. हा कार्यक्रम संस्थेचे माननीय सचिव श्री. मालोजीराजे छत्रपती यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आला.




