AISSMS अभियांत्रिकी महाविद्यालयाद्वारे जपानमधील जागतिक करिअर संधींविषयी अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या (AISSMS) अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेंटर फॉर इन्फॉर्मेशन, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (CITP) आणि आंतरराष्ट्रीय संबंध कक्ष (International Relations Cell) यांच्या संयुक्त विद्यमाने “बिल्डिंग ग्लोबल करिअर्स” या विषयावर विशेष ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना जपानमधील रोजगाराच्या संधी, तेथील औद्योगिक संस्कृती आणि जागतिक करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणे हा होता.
या कार्यक्रमात कांडेनको कंपनी लिमिटेड, जपान तसेच ए टू जे हिरामेकी संस्थेच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी जपानमधील रोजगाराच्या संधी, उद्योगांच्या अपेक्षा, आवश्यक कौशल्ये, कार्यसंस्कृती तसेच अभियांत्रिकी पदवीधरांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी श्री. नागातोमो हिरोशी, श्री. तोईदा हिरोयुकी, श्री. होशी युताका, श्री. मात्सुओ टोमोआकी (कांडेनको कंपनी लिमिटेड, जपान), श्री. डाइसुके अकाबाने (एशिया टू जपान), तसेच श्री. प्रज्वल चन्नागिरी आणि सौ. मॅनव्हेला जेरे (ए टू जे हिरामेकी) उपस्थित होते. प्रतिनिधीमंडळाने विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यासाठी विभागप्रमुखांशीही संवाद साधला.
कार्यक्रमास विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांना जागतिक रोजगाराच्या संधी, आंतरराष्ट्रीय उद्योगांचे निकष आणि कौशल्यविकासाचे महत्त्व समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमणे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय उद्योगांशी असलेले सहकार्य आणि जागतिक स्तरावरील संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्यविकासावर भर देणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळून त्यांना जागतिक स्तरावर करिअर घडविण्याच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
एआयएसएसएमएस संस्थेचे मानद सचिव श्री. मालोजीराजे छत्रपती यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे असे उपक्रम संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि जागतिक ओळखीला अधिक बळकटी देणारे असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. एस. एच. वानखेडे (डीन – इंटरनॅशनल रिलेशन्स), श्री. रुत्विज एस. जाधव (डीन – ट्रेनिंग अँड प्लेसमेंट) आणि डॉ. शिल्पी भुईनयन (असोसिएट डीन – ट्रेनिंग अँड प्लेसमेंट) यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी एआयएसएसएमएस संस्थेचे मानद सहसचिव श्री. सुरेश प्रताप शिंदे, मानद कोषाध्यक्ष श्री. अजय पाटील तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष Advocate भगवानराव बाबुराव साळुंखे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना जागतिक करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
सध्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिपत्याखाली स्वायत्त (Autonomous) दर्जा, ‘ए+’ मानांकन प्राप्त NAAC मान्यता, NBA मान्यताप्राप्त अभ्यासक्रम, उत्कृष्ट प्लेसमेंट, आंतरराष्ट्रीय उद्योगांशी सहकार्य, संशोधन व नवोपक्रमाला चालना देणारे वातावरण आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा यांमुळे एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाचे एक अग्रगण्य केंद्र म्हणून ओळखले जाते. अशा जागतिक स्तरावरील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना देश-विदेशातील करिअरच्या संधींसाठी सक्षम बनविण्याच्या महाविद्यालयाच्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा प्रचिती आली.




