—
### *जागतिक लिंगायत महासभेची विचारमंथन बैठक कोल्हापुरात संपन्न*
*कोल्हापूर, 12 जुलै 2026* : जागतिक लिंगायत महासभेची कार्यकारी मीटिंग व विचारमंथन बैठक रविवार दि. 12 जुलै 2026 रोजी दिगंबर जैन मल्टीपर्पज हॉल, दसरा चौक, कोल्हापूर येथे माननीय *कॅम्पगौडा निवृत्त जिल्हा न्यायाधीश* यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
या बैठकीसाठी कर्नाटकातील *24 जिल्ह्यांचे* तर महाराष्ट्रातील *9 जिल्ह्यांचे* प्रतिनिधी विशेष उपस्थित होते.
*कार्यक्रमाची सुरुवात*
बैठकीचे प्रास्ताविक *मा. यश आंबोळे* यांनी केले तर स्वागत व पाहुण्यांचा परिचय *मा. सरलाताई पाटील* यांनी करून दिला.
*बैठकीतील महत्वाचे ठराव*
सदर बैठकीत बसवण्णांच्या *मानवतावादी विचारांचा प्रसार* करणे आणि लिंगायत चळवळीला अधिक गती देण्यासाठी सविस्तर मंथन करण्यात आले.
*उपस्थित मान्यवर*
या प्रसंगी महाराष्ट्रातील *कोल्हापूर राजशेखर तंबाके ,मनोज कुमार रणदिवे, शंकर बिराजदार, नाना गवळी, विभुते सर , संतोष साखरे,देवताळे सुधाकर तोडकर बसवराज आजरी, वैभव सावर्डेकर, सुरेश जांभुरे रजनीताई मगदूम ,विलास आंबोळे ,प्रभाकर कुलगुडे, विजय पाटील, महाजन सर सांगली जिल्ह्यातून नाना मेनकुदळे ,शेगावे सातारा जिल्ह्यातून कस्तुरे पुणे जिल्ह्यातून बसराज कनजे, चंद्रकांत हरकुडे ,सिद्धू नावदगेरे, लातूर जिल्ह्यातूनलक्ष्मण आप्पा मुकडे नांदेड जिल्ह्यातील व्ही एस शेटे व दिगंबर भालके प्रतिनिधी उपस्थित होते.
कर्नाटकातून *अॅड. बसवराज रोड, बसवराज धनुर, जे. बी. पाटील बेंगलोर, जी. बी. पाटील विजापूर* आदी मान्यवर उपस्थित होते.
बसवण्णांच्या *”कायकवे कैलास”* तत्वानुसार समाज प्रबोधन आणि संघटन मजबुतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
—




