खुशी कांबोज ची अमेरिकेतील ‘कॅम्प ऑगस्टा’ च्या “वील्डरनेस प्रोग्राम” संचालक पदी निवड

Spread the news

खुशी कांबोज ची अमेरिकेतील ‘कॅम्प ऑगस्टा’ च्या “वील्डरनेस प्रोग्राम” संचालक पदी निवड.

­

 

1931 साली एडविन विल्यम एहमान आणि शार्लेट एहमान यांनी “कॅम्प ऑगस्टा” ची सुरवात केली. कॅलिफोर्निया स्टेट मधील, नेवाडा सिटी जवळील सियेरा नेवाडा पर्वतरांगांच्या, सुंदर जंगलामध्ये 90 एकर परिसरात हा कॅम्प आहे. ही जागा त्या काळातील ‘पिडमाऊंट कॅम्प फायर गर्ल्स’ या संस्थेला त्यांनी दान दिली होती. शार्लेट यांच्या आई ऑगस्टा कॉलीन्स यांच्या स्मरणार्थ, ‘कॅम्प ऑगस्टा’ असे नाव ठेवण्यात आले.

  •  

१८४९-५० सालात कॅलिफोर्निया परिसरात सोन्याचा शोध (Gold rush ) सुरू होता. आज जिथे कॅम्प आहे तिथे पूर्वी सोन्याच्या खाणी होत्या.

कॅम्प ऑगस्टा ची स्थापना 1931 साली झाली. सुरुवातीला हा फक्त मुलींसाठी निवासी कॅम्प होता. पुढील अनेक दशके ‘कॅम्प फायर गर्ल्स’ या संस्थेद्वारे फक्त मुलींसाठी निवासी कॅम्प चालवला जात होता. मुलींना निसर्ग, नेतृत्व, स्वावलंबन, आणि मैदानी जीवनाची शिकवण दिली जात होती.

2000 च्या दशकात, संचालक रँडल ग्रेसन यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प ऑगस्टा मध्ये मोठे बदल झाले. मुलींच्या सोबत मुलांनाही प्रवेश सुरू झाला . नवीन साहसी उपक्रम सुरू झाले. कॅम्प मध्ये फक्त ऍक्टिव्हिटी वर भर न ठेवता, कॅम्प मधील जादुई अनुभव, दृढ नातेसंबंध, सृजनशीलता आणि वैयक्तिक विकास यावर भर दिला गेला.

आजच्या घडीला, ‘कॅम्प ऑगस्टा’ जगातील सर्वात वेगळ्या समर कॅम्प पैकी एक मानला जातो. 1931 मध्ये सुरू झालेला कॅम्प ऑगस्टा, हा फक्त समर कॅम्प नाहीतर, निसर्ग, साहस, मैत्री, आणि आयुष्यभरासाठी प्रेरणा देणारे अनुभव घडवणारे जादुई ठिकाण आहे.

खुशी 2025 पासून कॅम्प ऑगस्टा येथे कौन्सिलर म्हणून कार्यरत आहे. कॅम्प ऑगस्टा मध्ये कौन्सिलर मुलांच्यावर फक्त लक्ष ठेवत नाहीत, तर ते मुलांसोबतच राहतात, त्यांचे ऐकून घेतात, त्यांना नवीन गोष्टी शिकवता, भीतीवर मात करण्यासाठी मदत करतात, त्यांचा आत्मविश्वास वाढवतात. कॅम्प ऑगस्टा चे ध्येय म्हणजे तिथे प्रत्येक मुला-मुलीस असे वातावरण दिले जाते, ज्यामुळे ती मुले-मुली नवीन गोष्टी करून पाहू शकतात, अपयशाला घाबरत नाहीत, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतात, इतरां बद्दल सहानुभूती विकसित करतात आणि निसर्गाशी त्यांचे घट्ट नाते जोडले जाते.

या कॅम्पमध्ये खुशी मागील वर्षा पासून कार्यरत होती. तिचा अनुभव, मुलांना शिकवण्याची शैली, कामाप्रती तिची असणारी निष्ठा हे पाहूनच तिला “विल्डरनेस प्रोग्राम” डायरेक्टर पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.

कोविड काळानंतर कॅम्प ऑगस्टा चे ‘वील्डरनेस प्रोग्राम’ बंद झाले होते. त्यांना हा साहसी विभाग पुन्हा सुरू करायचा होता. खुशीचे गिर्यारोहणातील अनुभव, त्यातील तिने घेतलेले तंत्रशुद्ध शिक्षण, मुलांना ते समजवण्याची आणी शिकविण्याची तिची हातोटी हे सर्व तिचे गुण पाहूनच त्यांनी खुशीला “विल्डरनेस प्रोग्राम” ची डायरेक्टरशिप घेऊन, तो विभाग पुन्हा कार्यान्वयीत करण्याची मोठी जबाबदारी तिच्यावर सोपविली आहे. वील्डरनेस हा विभाग नव्याने सुरू करत असताना, कोणत्या ऍक्टिव्हिटी घ्यायच्या, त्याचा एरिया कोणता असावा, तिथे शिक्षण प्रणाली काय असेल, त्यासाठी लागणारे प्रशिक्षक त्यांचे ट्रेनिंग, कॅम्पचे प्रमोशन, कॅम्प साठी लागणारी साधनसामग्री, या सर्वांसाठी लागणारे बजेट, सुरक्षा प्रणाली, खानपान व्यवस्था अशा अनेक गोष्टींचा समन्वय साधून, हा विभाग तिला कार्यान्वयीत करावा लागणार आहे.

अमेरिकेत काम सुरू केल्यापासून दुसऱ्याच वर्षी, तिला डायरेक्टर पदी काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

साहसी क्रीडा प्रकारात, अमेरिकेसारख्या देशात अशी उच्चपदस्थ काम करण्याची संधी भारतात क्वचितच कोणाला मिळाली आहे. आपला स्वतःचा असा वेगळा छंद जोपासून, त्याच्या अनुभवावर जी उंची खुशीने गाठली आहे, त्याचा आम्हाला आई-वडील म्हणून सार्थ अभिमान आहे. आमच्याइतकेच किंवा त्याहूनही थोडे जास्त मार्गदर्शन खूशी ला कोणी केले असेल तर ते महीबूब मुजावर आणि गणेश गीध यांनी. खुशीच्या आजच्या या यशोगाथेमध्ये या दोघांचा वाटा खूप मोठा आहे.

एवढी मोठी जबाबदारी तिच्याकडून समर्थपणे पेलली जावी, यासाठी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा तिच्या पाठी राहोत.

संगीता कांबोज
विनोद कांबोज.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!