*राजे विक्रमसिंह घाटगेंच्या नावाने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची नवोदितादेवी घाटगेंनी केली घोषणा*
*शिक्षक,अंगणवाडीसेविका,आशा स्वयंसेविकांसह बचत गटांचा होणार सन्मान*
कागल,प्रतिनिधी.
सुधीरचंद्र गंदूगडे (हमिदवाडा), रामगोंडा खोत (सुळकुड), कृष्णात कांबळे (सिद्धनेर्ली), दिनकर वाडकर (व्हन्नाळी), प्रकाश मगदूम (एकोंडी), कृष्णात बारड (बेलवळे खुर्द),प्रकाश चौगुले (कागल), सुधाकर वारुषे( कापशी),शंकरराव गुरव(कागल),विलास पाटील (लिंगनूर दुमाला) व धुळप्पाश खंदारे (सुरूपली) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला.
शाहू उद्योग समूहाचे संस्थापक सहकार महर्षी राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७८व्या जयंतीचे औचित्य साधून या पुरस्कारांची घोषणा राजे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदितादेवी घाटगे यांनी केली.
शैक्षणिक क्षेत्रात आदर्श कामगिरी करणाऱ्या तसेच सामाजिक बांधिलकी,सेवा आणि समर्पणाच्या भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका तसेच महिला बचत गटांचा यथोचित सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात.
राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.
यावर्षी कागल,करवीर,आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील एकूण ६९ शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राथमिक विभागातील ३३ माध्यमिक विभागातील ३६, जीवन गौरव पुरस्कारासाठीचा ११ मानकरी यांचा समावेश आहे.२७ अंगणवाडीसेविका, २४ आशा स्वयंसेविका व २६ महिला बचत गटांचा सुद्धा सन्मान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि कोल्हापुरी फेटा असे असून, शिक्षकांचा सहपत्नीक/सहपती सत्कार समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम लवकरच निश्चित करण्यात येणार असून, त्याची तारीख व ठिकाण पुरस्कारप्राप्त शिक्षकांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.
पुरस्कार प्राप्त मानकरी यांची विभागवार नावे अशी आहेत.
प्राथमिक विभाग
राजाराम डोंगळे (मुख्याध्यापक, शेंडूर), जयसिंग पाटील (मुख्याध्यापक, कोनवडे), स्वप्निल सांगले (सुळकूड), अरुणा घराळ (सिद्धनेर्ली), स्नेहलता मोरे (सोनाळी), प्रियांका फराकटे (फराकटेवाडी), रामदास पाटील (पिराचीवाडी), तानाजी तिकोडे (बेलवळे खुर्द), जयवंत बलुगडे (बोरवडे) कृष्णात पाटील (कुरुकली) सचिन पाटील (कौलगे), महादेव काटकर (चिखली), श्रीकांत कुंभार (अर्जुनवाडा), जयप्रकाश कांबळे (तमनाकवाडा), करसिद्ध अनुसे (बेलेवाडी का), सदाशिव दिवटणकर (वडगाव कापशी), आबुसो शेरेकर (करंबळी), संतोष कानडे (बेळगुंदी), विजयकुमार शिंदे (ऐनापुर), सोनल जाधव( गिजवणे), सुवर्णा पवार (मडिलगे), शिवाजी मोरे( चिमणे ),सुरेखा घाटगे (मुमेवाडी), दिलीपकुमार कांबळे( होन्याळी), मनीषा चौगुले( कागल), कांचन देसाई (कागल), शोभा हेरेकर (उत्तुर),स्वाती गुरव (गडहिंग्लज),धनाजी पाटील( जैताळ), राजू कांबळे( कळंबा), दीपक वारंगे (पाचगाव), संयोगिता महाजन (चिंचवाड), संग्राम कोपार्डेकर (कागल),
माध्यमिक विभाग
शांताराम खांबे (मुख्याध्यापक बिद्री), दिपाली देसाई (मौजे सांगाव), बाबासाहेब मायनवर(मौजे सांगाव),वैशाली मिरजे (कसबा सांगाव),दत्तात्रय मालवेकर( सावर्डे खुर्द), अर्जुन तळेकर( केनवडे), ए.डी.चौगुले(म्हाकवे), चंद्रकांत गुरव (एकोंडी), सुभाष पाटील(कुरणी), दत्तात्रय पाटील(कुरणी), बाळासाहेब बोडके (उंदरवाडी), गजानन पाटील(भडगांव), सुनील पोवार (करंजिवणे),मारुती टिपुगडे (करड्याळ), कृष्णात पाटील( मुगळी), युवराज साळोखे (ठाणेवाडी), विलास परीट( माद्याळ), सारिका बटकडली(कडगाव),प्रभावती मुगळी (लिंगनूर कसबा नूल), संतोष कांबळे (बेकनाळ),अर्चना पाटील( इंचनाळ), महादेव पाटील (सोहाळे), किरण चव्हाण (पांगिरे ),अशोक लोहार( मुख्याध्यापक धामणे), सदाशिव दिवेकर( भादवण), उज्वला घायतडक (कागल), अश्विनी गोरुले( मुरगुड), संभाजी तिबिले( उत्तूर), विजयकुमार शेडगे (गडहिंग्लज),माधुरी पोवार (गडहिंग्लज),श्रीमती विद्या नेर्लेकर (सांगवडेवाडी),सचिन पाटील(दत्तनगर ता-शिरोळ), अतुल कुंभार( नंदगाव), लता पाटील( गोकुळ शिरगाव), सविता पाटील( द-याचे वडगांव), शिवाजी पोवार (सिद्धनेर्ली),
अंगणवाडी सेविका
संगीता पोवार (पिंपळगाव खुर्द), कांचन कुलकर्णी( करनूर), अलका देवमाने (रणदिवेवाडी) नंदा पार्वते( सुळकूड), अर्चना बाबर (बामणी), बाळाबाई तळेकर (केनवडे), गीता शिंत्रे (आनुर), अनिता पवार( भडगांव), सुनिता सावंत(बेलवळे खुर्द), शशिकला पोवार(बाचणी), विद्या जोंधळे( निढोरी), लताताई कोरे( बाळीक्रे), कमल तिप्पे( तमनाकवाडा), सविता काटे (कासारी), वनिता गुरव (अलाबाद), शांताबाई दळवी (बड्याचीवाडी), वंदना सलपे (करंबळी), जयश्री गोडसे( आत्याळ), संगीता कोंडूस्कर (सोहाळे), आशा शिंदे (चिमणे), अंजना कांबळे (धामणे), सुप्रिया जोशी (कागल), नंदिनी माळी (मुरगुड), यास्मिन नाईकवाडे (उत्तूर), सरोजिनी येसादे (उत्तुर ),आक्काताई पाटील (कणेरी), अनिता पाटील (नागांव ), माधुरी जाधव (लिंगनूर दूमाला),सुगंधा मोटे( सुळकूड) सुजाता मगदूम( सिद्धनेर्ली), माधुरी गोडसे (गोरंबे), सुनिता पाटील (म्हाकवे), सुवर्णा माने( पिंपळगाव बुद्रुक ),यशोदा गायकवाड (बिद्री ),सरिता मस्कर (उंदरवाडी), ललिता भागवत (केंबळी), लक्ष्मी शिंत्रे (चिखली), साधना खराडे(शिंदेवाडी)’ शोभा ढेंगे (नंद्याळ), स्वाती कुराडे (कापशी), गीता बोटे (हसुर बुद्रुक), विजयमाला मोरे (वडरगे), विद्या बागडी (कौलगे),रूपाली गुरव( होन्याळी),उमा भाटले(होन्याळी), शितल मगदूम( धामणे), आशा सुतार (भादवण),रेशमा कुंभार (उत्तुर), शितल मगदूम (उत्तुर),सीमा कांबळे (हलसवडे), छाया तिरुके( दिंडनेर्ली),
आदर्श बचत गट
जिजामाता करनूर, श्री गणेश सुळकुड, ज्वालामालिनी कसबा सांगाव, आदर्श लिंगनूर दूमाला, शिवशक्ती व्हन्नूर , परी व्हनाळी, भवानी माता बानगे, शिवशक्ती व्हन्नुर, जिजामाता महिला बचत गट पिंपळगांव खुर्द , भारतमाता स्वंय सोनाळी,वीरभद्र बाचणी, सहेली पिराचीवाडी, जयमल्हार सहाय्यता निढोरी, सिद्धिविनायक स्वंयसहाय्यता महिला समुह चिखली, स्वयंरोजगार महिला स्वंयसहाय्यता बेनिक्रे, ज्ञानेश्वरी स्वंयसहाय्यता महिला बेलेवाडी मासा, दुर्गा माता करड्याळ, अंबाबाई हुडावाडी माद्याळ, सावित्रीबाई फुले वडगाव, अन्नपूर्णा शिप्पुर तर्फे आजरा, हरिओम हिरलगे, ओम चेतन मडिलगे, नवनाथ स्वंयसहाय्यता महिला मुरगुड ,अलिशान गडहिंग्लज, वैभवलक्ष्मी स्वंयसहाय्यता महिला कणेरीवाडी भरारी महिला बचत गट नेर्ली.
सदर बातमीत स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांचा फोटो वापरावा




