सहकारमहर्षी स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना अकराव्या स्मृती दिनानिमित्त शाहू कारखाना कार्यस्थळावर अभिवादन

Spread the news

सहकारमहर्षी स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना अकराव्या स्मृती दिनानिमित्त शाहू कारखाना कार्यस्थळावर अभिवादन

­

 

विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेतकऱ्यांची अभिवादनसाठी दिवसभर रीघ
कागल, ता. १३ :
शाहू साखर कारखान्याचे संस्थापक, सहकार क्षेत्रातील जाणते नेतृत्व आणि सहकार महर्षी स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त कागल येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखाना कार्यस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आले.
कारखान्याच्या प्रधान कार्यालयाच्या प्रांगणातील स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या पुतळ्याचे पूजन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास तसेच कागल संस्थानाचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.दरम्यान त्यांनी सकाळी कसबा बावडा कागलवाडी येथील स्व.घाटगे यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

  •  

या प्रसंगी राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप बँकेच्या अध्यक्षा सौ. नवोदितादेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील,संचालिका सौ.रेखाताई पाटील, सौ. सुजाता तोरस्कर,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण तसेच शाहू समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
मान्यवरांसह शेतकऱ्यांची अभिवादनसाठी दिवसभर रीघ

स्मृतीदिनानिमित्त दिवसभर राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, कृषी व सहकार क्षेत्रातील मान्यवरांसह सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.परिसरात आदर,कृतज्ञता आणि स्मरणभावनेचे वातावरण निर्माण झाले होते यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शिल्पा खोत, पंचायत समितीच्या सभापती सौ. सुवर्णा पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ.शिवानी भोसले,पंचायत समितीचे सदस्य,जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने,बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील,कागलचे उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांच्यासह नगरसेवक,भगवानराव काटे यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता.

छायाचित्र
कागल येथे श्री,छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यावर स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादनवेळी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदितादेवी घाटगे,कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील,संचालिका सौ. रेखाताई पाटील, सौ.सुजाता तोरस्कर,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण तसेच शाहू समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सभासद शेतकरी.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!