नेदरलँड्समधील इरॅस्मस मेडिकल सेंटर सोबत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सामंजस्य करार

Spread the news

*नेदरलँड्समधील इरॅस्मस मेडिकल सेंटर सोबत*
*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सामंजस्य करार*

­

 

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर आणि नेदरलँड्समधील जागतिक दर्जाच्या इरॅस्मस मेडिकल सेंटर, रोटर्डम यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संशोधन आणि शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा मिळणार असून विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांसाठी जागतिक स्तरावरील संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

  •  

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या वैद्यकीय जैवतंत्रज्ञान, स्टेम सेल्स व पुनरुत्पादक वैद्यकशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे -तिवारी यांनी १५ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत नेदरलँड्समधील इरॅस्मस मेडिकल सेंटर येथे शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी भेट दिली. या भेटीदरम्यान विविध संशोधन प्रयोगशाळांना भेटी, संशोधकांशी संवाद आणि भविष्यातील संयुक्त संशोधनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी हा सामंजस्य करार करण्यात आला.

याबाबत डॉ. अर्पिता पांडे तिवारी म्हणाल्या, या भेटीदरम्यान झालेला सामंजस्य करार हा दोन्ही संस्थांसाठी महत्त्वाचा टप्पा असून भविष्यात विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. या करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये संयुक्त संशोधन, विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, शैक्षणिक सहकार्य तसेच नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांना चालना मिळणार आहे.

डॉ. तिवारी यांनी कार्बन क्वांटम डॉट्स, नॅनोबायोटेक्नॉलॉजी, बायोसेंसर, कर्करोगाचे प्रारंभिक निदान आणि वैद्यकीय निदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकास यावर संशोधन केले आहे. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये संशोधन लेख प्रकाशित केले असून त्यांच्या नावावर अनेक पेटंट्स आहेत. त्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी सातत्याने मार्गदर्शन करत आहेत.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, , कुलगरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील, अधिष्ठाता डॉ. सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

*नेदरलँड* – सामंजस्य करारावेळी डॉ. अर्पिता पांडे तिवारी प्रा. पीटर व्हॅन डेर स्पेक व प्रा. लिंडा होडेलमन्स


Spread the news

You may also like

error: Content is protected !!