शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनास हायकोर्टाची स्थगिती : भरत रसाळे व अंबादास नन्नवरे यांची माहिती

Spread the news

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनास हायकोर्टाची स्थगिती : भरत रसाळे व अंबादास नन्नवरे यांची माहिती
कोल्हापूर :खाजगी प्राथमिक शाळेतील लिपिक व सेवक या शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांचे अन्यत्र समायोजन करावे असा आदेश दि . 17 एप्रिल 2026 रोजी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालया मार्फत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेला होता . या आदेशा विरोधात महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती संलग्नित मराठवाडा प्राथमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघ यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका क्र .CA 5387/2026 ने दाद मागितली होती .या याचिकेमध्ये RTE 2009 या कायद्यासह .दि 17 एप्रिल . 2026 च्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्यत्र समायोजन करण्याच्या आदेशास स्थगिती मिळावी अशी मागणी केली होती . याची 6 में रोजी जस्टीस किशोर संत व जस्टिस सुशील घोडेस्वार यांच्या समोर तात्काळ सुनावणी झाली . त्यानंतर कोर्टाने राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांच्या अन्यत्र समायोजनास स्थगिती दिली असून याबाबतचे लेकी म्हणणे मांडण्यासाठी केंद्र सरकारला व राज्य शासनाला 11 जून पर्यंत मुदत दिलेली आहे .तोपर्यत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेशित केले आहे .या आदेशामुळे राज्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मध्ये समाधान पसरलेले आहे .
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज शिक्षणाधिकारी डॉ मीना शेंडकर ,सहायक शिक्षण संचालक गणपती कमळकर व शिक्षण निरीक्षक बालाजी यरनाडकर यांची भेट घेऊन या याचिकेचा अंतिम निर्णय लागेपर्यंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अन्यत्र समायोजन करू नये अशी विनंती केली ‘ती या सर्व अधिकाऱ्यांनी मान्य केलेली आहे . तसेच राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांना देखील निवेदन देऊन 17 एप्रिल 2026 च्या आदेशास स्थगिती दिलेली असलेने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अन्यत्र समायोजन करण्याची प्रक्रिया थांबवावी असे निर्देश राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना द्यावेत अशी मागणी केलेली आहे . या याचिकेवर तात्काळ सुनावणी व्हावी यासाठी भरत रसाळे , रविंद्र देशपांडे , अंबादास नन्नवरे व विश्वनाथ शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले .
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना आज भेटलेल्या शिष्टमंडळात राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्यासह राज्यसचिव शिवाजी भोसले , जिल्हाध्यक्ष कुमार पाटील , शहराध्यक्ष आप्पासाहेब वागरे ,पतसंस्थेचे चेअरमन साताप्पा कासार , संस्थापक विठ्ठल पाटील , कृष्णात चौगुले , सर्जेराव नाईक , संदीप सातपुते यशवंत पाटील ,प्रल्हादसिंह शिलेदार , पांडूरंग नायकवडे , शिक्षक सेनेचे समन्वयक संतोष आयरे एस एस पाटील ,, राजेंद्र कांबळे , संजना देसाई, रघुनाथ पाटील सचिन वसावे हे उपस्थित होते .

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!