खासबाग कुस्ती मैदान व्यासपीठ इमारत पूर्वीप्रमाणे बांधकाम करणे संदर्भात आपण दिलेले आश्वासन…

Spread the news

खासबाग कुस्ती मैदान व्यासपीठ इमारत पूर्वीप्रमाणे बांधकाम करणे संदर्भात आपण दिलेले आश्वासन…
केशवराव भोसले नाट्यगृह शेजारी खासबाग कुस्ती मैदान जवळील दुर्घटनेनंतर शासन निधीतून या दोन्ही वास्तूंचे पुनर्बांधकाम करण्यात येत आहे. या संदर्भात कुस्ती मैदान, इमारत व्यासपीठ बांधकाम चुकीच्या पद्धतीने होत आहे हे आम्ही अगदी प्राथमिक अवस्थेत प्रत्यक्ष जागेवर नोव्हेंबर २०२५ मध्ये मा. शहर अभियंता, मा. प्रकल्प अभियंता यांना माहिती देऊन दाखवून दिले होते. त्यातील पोलादी गर्डर का काढले याचीही विचारणा केली होती. त्याचबरोबर मैदान तटबंदी खचून एका भगिनीस प्राण गमवावे लागले होते. त्यावेळी झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये १०० हून अधिक ठिकाणी तटबंदीतील धोकादायक तडे गेले असल्याचे निदर्शनास आले. दोन वर्षे झाली याबाबत दुरुस्तीचा अधिकृत हेरिटेज समितीकडे आराखडाच दिला नसल्याचे समजते. काही वर्षांपूर्वी मैदानाचे ऐतिहासिक रेलिंग व कठड्याचे रेलिंग कारण नसताना कोणत्याही परवानगीशिवाय बदलण्यात आले. निव्वळ इस्टिमेट वाढवून टक्केवारी लाटण्यासाठी अनावश्यक निकृष्ट बांधकाम करण्यात आले आहे. हे सर्व वारंवार आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. तरीपण यासर्व गोष्टींकडे महानगरपालिका प्रशासन व बांधकाम ठेकेदार यांनी दुर्लक्ष करून, हम करेसो कायदा या प्रमाणे चुकीच्या पद्धतीने हेरिटेज समितीलाही विचारात न घेता बांधकाम चालू ठेवले आहे.
महापौर महोदया काल दिवसभर आपल्या ऑफिसशी संपर्क करून आज आपणास निवेदन देण्याचे वेळ मागण्यासाठी रात्री दहापर्यंत प्रयत्न केले असता आपल्या ऑफिस मधील पीए यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून हे निवेदन ऑफिसला देत आहे
गेल्या महिन्यात खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या उपस्थित झालेल्या आढावा बैठकीत याचिविषयी आम्ही चर्चा उपस्थित केली. या विषयावर प्रचंड गदारोळ झाला. प्रशासन निरुत्तर झाले. त्यावेळी आपण स्वतः पोलादी गर्डर पुन्हा आणूया असे आश्वासन दिले होते. त्याचवेळी आपणासह आयुक्त व संपूर्ण प्रशासनाला आम्ही बजावून सांगितले होते की हे कुस्ती मैदान, व्यासपीठ इमारतीचे काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे ते थांबवा. निधीचा अपव्यय न करता तज्ञ, जाणकार मंडळी, हेरिटेज समिती यांना विश्वासात घेऊन जुने छायाचित्र व माहितीच्या आधारे पूर्वी सारखीच दिसणारी इमारत उभारली पाहिजे असे सांगितले होते. तरीही आज या क्षणापर्यंत हट्टाने बांधकाम चालू ठेवून राजर्षी शाहू महाराजांच्या जागतिक वारसा स्थळाचे विद्रूपीकरण करण्याचे काम चालू ठेवून निव्वळ उद्घाटन करून आपल्या प्रशासनाला मिरवून घेण्याचा ध्यास लागला आहे.
या निवेदनाद्वारे आम्ही आपणांस विचारणा करतो की आम्ही पूर्वी केलेली मागणी, आपण पोलादी गर्डर पुन्हा आणून उभे करू, मैदान व्यासपीठ इमारत जशीच्या तशी उभी करू या आश्वासनाचे काय झाले? यावर आपण काय करणार आहात? यावर आपण येत्या दोन दिवसांत आम जनतेसमोर जाहीर खुलासा करावा व राजर्षी शाहू महाराजांच्या जागतिक कीर्तीच्या वारसा स्थळाचे विद्रूपीकरण केल्याबद्दल आम्हांस रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागू नये याची दक्षता घेऊन सहकार्य करावे ही विनंती.

­

 

कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती

  •  

अशोक पोवार राष्ट्रीय तालीम संघ सचिव रमेश मोरे राजाभाऊ मालेकर चंद्रकांत सूर्यवंशी प्रकाश आमटे चंद्रकांत पाटील लहुजी शिंदे महेश जाधव सदानंद सुर्वे महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर निलेश देसाई महादेवराव जाधव प्राध्यापक शिवाजीराव पाटील


Spread the news

You may also like

error: Content is protected !!