क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सहवासातलेखक – प्राचार्य डॉ.दिनकर पाटील

Spread the news

*क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सहवासात*
*लेखक* – *प्राचार्य डॉ.दिनकर पाटील*
माझे गाव लिंब,तालुका तासगाव. कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील विद्यार्थी वसातिगृह मे 1971 ते एप्रिल 1979 पर्यंत शिक्षणासाठी होतो.आठ वर्षात फार मोठी माणसं भेटली. त्यांच्या सहवासात माझ्या आयुष्याचे सोने झाले. क्रांतिसिंह नाना पाटील,क्रांतिवीर तांबट काका, शेकडो स्वातंत्र्य सैनिकांच्या सहवास लाभला, हे आमचे भाग्य. होय क्रांतिसिंह नाना पाटील हे कुंडलच्या बोर्डिंग मध्ये आले होते त्यांचा मुक्काम बोर्डिंग मध्ये चार दिवस होता.त्यावेळी त्यांना आंघोळीला पाणी काढून देणे, जेवण देणे,आलेल्या कार्यकर्त्यांना चहापाणी करणे, ही जबाबदारी दलित मित्र तांबट काका यांनी माझ्यावर दिली होती.ही गोष्ट सन 1972 सालची आहे.क्रांतिसिंह नाना पाटील हे पैलवान होते.हिंदकेसरी यांच्यासारखी त्यांची तब्येत होती. त्यांच्या वागण्या बोलण्यातून आणि चालण्यातून माणसातील माणूस किती थोर होता याची कल्पना आली. एक महान क्रांतिकारक शेतकऱ्याचा नेता थोर समाज सुधारक ते होते.छत्रपती शिवाजी महाराज यांनी गनिमी काव्याने स्वराज्याची स्थापना केली. शेकडो सवंगडी एकत्र करून सर्वसामान्य माणसाला न्याय दिला.अगदी तशाच पद्धतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा प्रतिसरकारची स्थापना केली आणि गनिमी काव्याने इंग्रजांच्याशी दोन हात करून चार वर्षे प्रतिसरकार चालविले.सर्वसामान्य लोकांचा विश्वास व प्रेम हे क्रांतिसिंह नाना पाटील यांना मिळाले. जंग जंग पछाडले तरी ब्रिटिशांना ते सापडले नाहीत.आम्ही विद्यार्थी ओळीने क्रांतिसिंह नाना पाटील यांना वाकून नमस्कार करीत होतो.साधारणपणे 125 मुले बोर्डिंग मध्ये होती.त्यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील म्हणाले मुलांनो चांगले शिक्षण घ्या. आपल्या आई-वडिलांना गुरुजनांना व देशाला विसरू नका.तांबट काका आहेत हे तुमचे आई-वडील आहेत त्यांना अंतर देऊ नका. तुमच्या भल्यासाठी ते सांगत आहेत.
आम्ही स्वातंत्र्य चळवळीत काम केले उपकार केले नाहीत. आमचे कर्तव्य होते म्हणून ते केले.माझ्या सहकार्याने राष्ट्रासाठी प्राण पणाला लावले.क्रांतिसिंहांचा सहवास लाभला याचा एक आनंद आम्हास मोठा होता.त्या धुंदीत आजही आहे त्यामुळे शिवाजी विद्यापीठाला एम फिल चा प्रबंध क्रांतिसिंह नाना पाटील आणि शेतकरी चळवळ या विषयावर केला.दुसरी आठवण म्हणजे मोराळे तालुका तासगाव हे गाव येरळा नदीच्या काठावर आहे.या ठिकाणी 21 सप्टेंबर 1976 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या शुभहस्ते व वसंतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण समारंभ होता मी व श्री ईलाई मुलानी आम्हा दोघांना त्या कार्यक्रमात पाच आउट उडवण्यासाठी तांबट काकांनी पाठवलेले होते. दोन सायकली आणि मोठे पाच आउट घेऊन दोघेजण गेलो होतो. क्रांतिसिंहाना भेटण्यासाठी जायचे म्हणून मी गेलो.तर एका शेतकऱ्याच्या घरात क्रांतिसिंह बसले होते.यावेळी त्यांचा मांडीतून पाय मधुमेहामुळे काढावा लागला होता.लाकडी माच होता त्यावर जेन टाकले होते आणि त्या माचावर क्रांतिसिंह बसले होते. आणा म्हणाले की,आम्ही मोराळे गावात प्रौढ साक्षरतेची शाळा सुरू केली होती. त्याचा प्रचार व प्रसार केला लोकांना शिक्षण मिळाले पाहिजे लोकांनीच मला एक सायकल साक्षरतेच्या प्रसारासाठी वर्गणी काढून दिली होती.माझ्यावर या गावाने मोठा विश्वास ठेवला व प्रेम दिले तुम्ही सर्वांनी नीतीने वागले पाहिजे चुकीचे काही करू नका. व्यसन करू नका मुलांनी शिक्षण पूर्ण करून देशाचे नाव केले पाहिजे.सरकार काय करते या तुरुंगात घालू दे की तुरुंगात अरे शेतकरी सुखी तर देश सुखी होईल.अशा आशयाचा त्यांचा सूर होता.क्रांतिसिंह नाना पाटील हे दोन वेळा खासदार झाले भारताच्या संसदेत
मराठी भाषेतून बोलणारे पहिले खासदार म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होय.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांना सांगा की नाना पाटलांची असे झाले इतका त्याग देशासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेला आहे. त्यांच्या शेकडो आठवणी आहेत आजच्या नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहतील असे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे प्रति शिवाजी क्रांतिसिंह नाना पाटील होय.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!