डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकला भारत सरकारकडून पेटंट

Spread the news

डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकला
भारत सरकारकडून पेटंट

­

 

कसबा बावडा येथील डॉ .डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘गॅस सिलेंडर वेट इन्डीकेटर स्टॅन्ड’ या डिझाईनसाठी भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले.

  •  

मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी साहिल गोडे, श्रेयस पाटील, पार्थ कांबळे, निलेश दिपक पाटील यांनी विभागप्रमुख प्रा. नितीन माळी, प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या मार्गदर्शनाखाली हे डिझाईन केले. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील तसेच विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

घरगुती तसेच हॉटेल क्षेत्रात एलपीजी सिलेंडरचा मोठ्या प्रमाणान वापर केला जातो. मात्र सिलेंडर मध्ये गॅस किती शिल्लक आहे याची अचूक माहिती अनेकदा उपलव्ध नसल्याने अचानक गॅस संपण्याची समस्या उद्‌भवते.तसेच गॅस गळतीमुळे दुर्घटना होऊ शकते. यावर उपाय म्हणून ‘स्मार्ट एलपीजी वेट मॉनिटरिंग सिस्टीम इंटिग्रेटेड विथ ऑटोमेटेड बुकिंग अँड सेफ्टी फीचर्स’ हा प्रकल्प विकसित करण्यात आला. या प्रणालीमध्ये लोड सेलच्या सहाय्याने एलपीजी सिलेंडरचे वजन सातत्याने मोजले जाते व गॅस सेन्सरद्वारे गॅस गळतीचे निरीक्षण केले जाते. सिलेंडरमधील गॅसची उपलब्धता रिअल-टाइममध्ये दर्शविली जाते. गॅसची पातळी कमी झाल्यास वापरकर्त्याला तत्काळ सूचना दिली जाते. तसेच गॅस गळती आढळल्यास बझर सक्रिय होऊन इशारा मिळतो व आवश्यक सूचना प्रदर्शित केल्या जातात.

सिलेंडरमधील गॅसची पातळी पूर्वनिश्चित मर्यादेपेक्षा कमी झाल्यास संबंधित माहिती लॅपटॉप किंवा मोबाईल ॲपवर पाठविली जाते व अलार्मद्वारे वापरकर्त्याला सतर्क केले जाते. त्यामुळे वापरकर्ता योग्य वेळी आवश्यक ती कार्यवाही करून गॅस संपण्यापूर्वी नवीन सिलेंडरची व्यवस्था करू शकतो. तसेच मोबाईल ॲपच्या माध्यमातून नवीन सिलेंडरचे बुकिंगही थेट करता येते.

यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, प्राचार्य डॉ. महादेव नरके, सी. एचआरओ श्रीलेखा साटम, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!