केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या सभेला शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन; आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून चांदीची तलवार देवून मंत्री अमित शाह यांचा सत्कार

Spread the news

*केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या सभेला शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन; आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून चांदीची तलवार देवून मंत्री अमित शाह यांचा सत्कार*
कोल्हापूर दि.२० : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर आले असून, आज त्यांच्या जाहीर सभेचे पोलीस ग्राउंड येथे आयोजन करण्यात आले होते. यासभेला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिकांनी भगवी रॅली काढून सभा स्थळी दाखल होत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
या भगव्या रॅलीची सुरवात दसरा चौक येथून करण्यात आली. यामध्ये हजारो शिवसैनिक, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगवे झेंडे, स्कार्फ व फलक घेवून दसरा चौक मार्गे महावीर कॉलेज मार्गे पोलीस ग्राउंड अशी ही भगवी रॅली संपन्न झाली. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “महायुतीचा विजय असो”, “केंद्रीय गृह मंत्री अमित शाह” यांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, सभा स्थळी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते चांदीची तलवार, भगवी शाल देवून जाहीर सत्कार करण्यात आला.
*फोटो ओळ : आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून चांदीची तलवार देवून मंत्री अमित शाह यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते.*

Spread the news

You may also like

error: Content is protected !!