पन्हाळगडावरील शिवछत्रपती मंदिर ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Spread the news

*पन्हाळगडावरील शिवछत्रपती मंदिर ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*

­

 

मासाहेब जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात शिवछत्रपतींच्या माध्यमातून पूर्ण केले.

  •  

असंख्य मावळ्यांनी मासाहेब जिजाऊ व शिवछत्रपतींना गुरु मानून स्वराज्यासाठी स्वतःला बलिदान केले.

छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन कित्येक क्रांतिकारी व समाज सुधारक यांनी अन्यायाच्या विरोधात लढा दिला. शिवछत्रपती म्हणजेच प्रेरणा.

शिवछत्रपतींचा आदर्श नेहमी युवकांच्या नसानसात असाच तळपत राहो व देशभक्तीसाठी  आदर्शवत होवो या शुभेच्छा गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित वक्त्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या .

 

छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्रातील गिरिदुर्गातील एकमेव मंदिर पन्हाळगडावर छत्रपती शाहू महाराज यांनी सन १९१३ रोजी स्थापित केलेले आहे.

दर पौर्णिमेस या ठिकाणी नवीन युवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने गेली १४ वर्षे झाले अखंडपणाने शिवछत्रपतींचा जागर केला जातो.

आजची गुरुपौर्णिमा ही अतिशय उत्साहाने पन्हाळगडावर शिवभक्तांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.

आजच्या कार्यक्रमास पुनम तोडकर, अमृता व्हनागडे, डॉ अजित देसाई, आदीसह

एकनाथ पाटील, पुंडलिक बिरांजे( बापू)

पैलवान जयसिंग चौगुले, प्रा आनंद गिरी सर, थोरबोले सर,डॉ. अमर जाधव,रमेश खोपकर,अमित मोळे, विकास बिसुरे,भोसले साहेब, आदीसह शिवभक्त उपस्थित होते.

शिवछत्रपतींचा पन्हाळा गडावरील इतिहास  संतोष कांदेकर यांनी व्यक्त करून शिवछत्रपतींच्या जागर मध्ये सहभाग होण्याचे आवाहन केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!