Spread the news

शासनाने श्यामचे पुस्तक अल्प किमतीत उपलब्ध करून द्यावे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार _
साथी शिवाजीराव परुळेकर
कोल्हापूर दिनांक 3 — सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नैतिक मूल्ये ढासळत असताना, भविष्यात मूल्यांची अधोगती थांबवायची असल्यास साने गुरुजींचे संस्कार युवा पिढीवर होणे गरजेचे आहे. यासाठी साने गुरुजींचे साहित्य अल्प किमतीत युवकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने आता पुढाकार घ्यावा. यातील पहिला टप्पा म्हणून जागतिक पातळीवर सर्वमान्य झालेले श्यामची आई साने गुरुजींचे संस्कारक्षम पुस्तक नाममात्र पाच रुपये किमतीत शासनाने सर्वत्र पोहोचेल अशी योजना असावी अशी आग्रही मागणी जनता नागरी निवारा संघटनेचे अध्यक्ष साती शिवाजीराव परळीकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. यापूर्वी या मागणीसाठी हजारो पोस्ट करण्याची मोहीम 5000 सह्यांची मोहीम द्वारे शासनाकडे ही मागणी लावून धरली होती पण शासनाने पूर्वी लोकराज्यचा एक अंक साने गुरुजी विशेषांक म्हणून प्रसिद्ध केला, व या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. जेव्हा प्रत्यक्ष पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन याचे सर्व हक्क पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन कडे आहे अशी टोलवाटोलवी केली. मात्र गोरगरीब अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पांना घेताना त्यांचे हक्क अबाधित न ठेवता मनमानीपणे शासन या जमिनी अधिग्रहण करते. याचा सोयीस्कर विसर त्यांना पडतो. आता कायद्यानुसार संबंधित लेखाच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी प्रकाशनाचे स्वामी व हक्क संपुष्टात येत असल्याने श्यामच्या आईच्या पुस्तकाचे पुणे विद्यार्थी गृह प्रकाशनचे हक्क साने गुरुजींच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी म्हणजे 11 जून 2010 रोजीच स्वामित्व हक्क संपुष्टात आले आहेत. शासनाला पाच किंवा दहा रुपयाच्या अल्प किमतीत हे पुस्तक वाचकांना, विद्यार्थ्यांना,युवकांना उपलब्ध करून देण्यास आता काहीच अडचण नाही. सत्तेसाठी अपात्र लाडक्या बहिणींच्या मतासाठी हजारो कोटी रुपयांचा सौदा करणाऱ्या, शासनाने याच लाडक्या बहिणींच्या मुलांना म्हणजे आपल्या भाचरांना चांगले संस्कार व्हावे व आपल्या लाडक्या बहिणींना भविष्यात सांभाळावे, वृद्धाश्रमात जायला लागू नये,याची काळजी घेण्यासाठी त्यांच्या मुलावर, मुलीवर,भाचरावर संस्कार व्हावेत म्हणून श्यामच्या आईचे हे पुस्तक आर्थिक तोट्याची चिंता न करता किमान दहा हजार प्रति प्रकाशित करून सर्वांना पाच एवढ्या अल्प किमतीत उपलब्ध करून द्यावे अन्यथा 11 जून 2026 या साने गुरुजी च्या स्मृतिदिनानंतर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दलित मित्र साथी शिवाजीराव परुळेकर यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे .
आवश्यक तर शासनाने वीस हजार प्रती या पुस्तकाच्या प्रकाशित कराव्यात व त्यापैकी दहा हजार प्रति पंचवीस रुपये किमतीने राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयाना प्रत्येकी पाच- पाच प्रति आमदार, खासदार फंडातून किंवा शाळा महाविद्यालयांच्या अनुदानातून, ग्रंथालया साठी देण्याचे नियोजन करावे.म्हणजे या पुस्तकांच्या किमतीतून मिळणाऱ्या नफ्यातून सर्वसामान्य वाचक व युवकांना, विद्यार्थ्यांना पाच रुपये एवढ्या अल्प किमतीत हे पुस्तक देणे शक्य होईल. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून तातडीने याबाबत निर्णय घेतला नाही तर 11 जून या साने गुरुजी स्मृतिदिना पासून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा पहिला टप्पा म्हणून, पाच हजार पोस्ट कारडे विद्यार्थी व तरुणांच्या कडून शासनाला पाठवली जातील. त्यानंतर एक लाख विद्यार्थी युवकांचे सह्याचे निवेदन पाठवले जाईल. त्यातूनही शासनाला जाग आली नाही तर,मात्र तरुणांना, युवकांना, विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रस्त्यावरची लढाई तीव्र करू.असा इशारा साथी शिवाजीराव परुळेकर यांनी दिला आहे
कृपया प्रसिद्धीसाठी

­

 

  •  

दलित मित्र साती शिवाजीराव परुळेकर


Spread the news

You may also like

error: Content is protected !!