स्व.स. आ. तथा मामासाहेब गुळवणी यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त वारणेत ७० गुणवंतांचा सत्कार संपन्न

Spread the news

*स्व.स. आ. तथा मामासाहेब गुळवणी यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त वारणेत ७० गुणवंतांचा सत्कार संपन्न*
वारणानगर – येथील वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाचे मार्गदर्शक व स्व. तात्यासाहेब कोरे यांचे जेष्ठ सहकारी स्व. मामासाहेब गुळवणी यांच्या २० व्या पुण्यतिथीनिमित्त वारणा परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मधील दहावी व बारावी परीक्षेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रथम आलेल्या ७०गुणवंत विध्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.चेतन मसूटगे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, कोडोली) मा.शिवाजीराव मानकर (गट
शिक्षणाधिकारी प. स. पन्हाळा),हे उपस्थित होते. सदरचा समारंभ मा.प्रो. डॉ.व्ही. व्ही.कारजिन्नी (मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर) मा. माधव गुळवणी (संचालक – वारणा दूध संघ ), मा. शिवाजीराव जंगम (संचालक, वारणा दुध संघ ) या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदरचा समारंभ तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना पुरस्कृत, वारणा सत्कार्य, वारणा युवक, क्रीडा प्रबोधिनी, महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या समारंभाचे संयोजन केले होते. समारंभाचे प्रास्ताविक ग्रंथमित्र प्रा. के. जी. जाधव (माजी उपप्राचार्य वारणा महाविद्यालय ) यांनी केले. प्रास्ताविकानंतर प्रा. यु. आर. पाटील यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्याची ओळख करून दिली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले व प्रा. पी. बी. बंडगर यांनी आभार मानले. समारंभ यशस्वी करणेसाठी प्रा. एस. आर. कुलकर्णी,श्री संजय जाधव,श्री.लखन करे,कु. रवि देवकर व सहकारी या सर्वांचे सहकार्य लाभले. वारणा परिसरामधील विविध संस्थांचे पदाधिकारी, सत्कार्य मंडळाचे सेवाभावी प्राध्यापक व सर्व शाळेचे शिक्षक,पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!