मनोरा हॉटेल ते हॉकी स्टेडियम रस्त्यावरील फूटपाथची दुरवस्था; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Spread the news

*मनोरा हॉटेल ते हॉकी स्टेडियम रस्त्यावरील फूटपाथची दुरवस्था; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर*

­

 

प्रेस नोट : गिरीश पाटील, ९०२८०३८२५०

  •  

*कोल्हापूर :* मनोरा हॉटेल ते हॉकी स्टेडियम या मार्गावरील फूटपाथवर मोठ्या प्रमाणात गवत, झाडी आणि झुडपे वाढल्यामुळे नागरिकांना या फूटपाथवरून चालणे अत्यंत अवघड झाले आहे. फूटपाथची नियमित स्वच्छता आणि देखभाल होत नसल्याने नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावरून चालावे लागत असून, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

या परिसरात वाढलेल्या झाडीमुळे सरपटणारे प्राणी फूटपाथवर येत असल्याचेही नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळी किंवा संध्याकाळी चालण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

याशिवाय फूटपाथवरील ड्रेनेजची झाकणे अनेक ठिकाणी उघडी असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. वाढलेल्या गवतामुळे ही उघडी ड्रेनेज नागरिकांच्या सहज लक्षात येत नसल्याने पाय घसरून किंवा ड्रेनेजमध्ये पडून अपघात होण्याची शक्यता आहे.

*महापालिका प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन मनोरा हॉटेल ते हॉकी स्टेडियम या संपूर्ण मार्गावरील फूटपाथची साफसफाई करावी, वाढलेले गवत व झाडी हटवावी तसेच उघडी असलेली सर्व ड्रेनेज तातडीने झाकून सुरक्षित करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.*

नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न असून, एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाने त्यापूर्वीच तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!