आमदार राजेश क्षीरसागर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे गेले बारा वर्षे आमदार व पाच वर्ष राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा या प्रमुख पदावर कार्यरत असून ते मतदार संघातील लोकांना आवश्यक्य असलेल्या मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ असल्याकारणाने त्यांनी जनतेची माफी मागून राजीनामा द्यावा सर्वच नागरिकांना लोकप्रतिनिधींकडून आपल्या हक्काच्या मूलभूत सुविधा दर्जेदार रस्ते स्वच्छ मुबलक पिण्याचे पाणी आरोग्य सेवा कचरा उठाव व विल्हेवाट दिवाबत्ती सुसज्ज असे क्रीडांगण व बगीचे इत्यादी मेळाव्यात ही प्रत्येक नागरिकांची अपेक्षा असते व ही मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी संबंधित लोकप्रतिनिधींचीच असते परंतु सर्व स्तरावर आमदार राजेश क्षीरसागर अपयशी ठरले आहेत
आमदार राजेश क्षीरसागर यांनी खालील प्रश्नांची उत्तरे जनतेला देणे क्रमप्राप्त आहे
शंभर कोटींच्या रस्ते प्रकल्पातील किती रक्कम आजतागायत उपलब्ध झाली व सध्या त्या रस्त्यांची परिस्थिती काय..?..
राजाराम बंधारा बावडा ते वडणगे पूल दहा वर्षापासून प्रलंबित
बावडा येथील झूम प्रकल्प संदर्भात आपण 15 वर्षात काय ठोस भूमिका घेतली
रंकाळा प्रदूषण थांबवण्यासाठी आपण काय उपाययोजना केली (श्याम सोसायटी बंधारा)
गेली कित्येक वर्षाच्या जयंती नालाचा प्रदूषणाचा प्रश्न जैसे थे
पंचगंगा प्रदूषणाचा विषय जैसे थे
शहरातील अतिक्रमणे व पार्किंग व्यवस्था संदर्भात आपण काय केले ?
एकूणच पाहता शंभर कोटींचे रस्ते राजाराम बंधारा अंबाबाई मंदिर भक्तनिवास अंबाबाई मंदिर परिसरातील ध्वनि युक्त खांब रंकाळा सुशोभीकरण बॉटनिकल गार्डन बावड्यातील कचरा प्रश्न आणि अन्य सर्वच गोष्टींची सध्या परिस्थिती पाहता आपण शहरातील लोकांचे कोणतेही समाधान करू न शकल्याने आपण राजीनामा द्यावा
उपस्थिती संजय पवार विजय देवणे विराज पाटील नवेज मुल्ला मनजीत माने प्रतिज्ञा उत्तुरे विशाल देवकुळे स्मिता सावंत अवधूत साळोखे संजय जाधव संतोष रेडेकर हर्षल पाटील



