चांगले सुसंस्कार आदर्श नागरिक घडवतात
भीमराव धुळूबुळू
मिरज : सुसंस्कार आदर्श नागरिक घडवतात प्रत्येक माणसाच्या जडणघडणीत आई-वडिलांचा वाटा मोठा असतो. जिजाऊंच्या संस्कारातूनच शिवाजी महाराज घडले. हे सर्व मातानीं लक्षात घेतली पाहिजे. असे विचार जेष्ठ साहित्यिक दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धूळूबुळू यांनी आखिल भारतीय लिंगायत माळी समाजोन्नती परिषद यांनी आयोजित केलेल्या समाजातील विविध सन्माननीय पदावर निवड झालेल्या व्यक्ती व विविध शैक्षणिक परीक्षांमध्ये विशेष नाही पुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्कार प्रसंगी बोलताना मांडले. यावेळी अध्यक्षस्थानी उद्योजक सुरज साखरे हे होते. सुरवातीस संघटक तुकाराम माळी यांनी दीपप्रज्वलन करून उदघाट्न केले.यावेळी अ. भा. लिंगायत माळी परिषद, शिवप्रसाद नागरी सह. पतसंस्था, व शिवप्रसाद विकास परिषद यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडल्या . सत्कार समारंभ प्रसंगी सुरुवातीस या संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर विजयराव धुळुबुळू यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रमुखपाहुणे म्हणून भीमराव धुळुबुळू बोलत होते ते पुढे म्हणाले वाईट गोष्टी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे माणूस सहज बिघडू.शकतो चांगल्या गोष्टी कष्टाने मिळवाव्या लागतात व कर्तुत्वातून स्वतःला घडवावे लागते. गुणवंतांचे आदर्श समाजात रुजले पाहिजेत.म्हणून असे सत्कार समारंभ केले जातात.तर अध्यक्ष सुरेश साखरे यांनी समाजातील विद्यार्थी अनेक परीक्षामध्ये नेत्र दीपक काम करत आहेत. समाजातील अनेक व्यक्ती उच्च पदावर जात आहेत.ही समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे.त्याचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे.असे मत व्यक्त केले. या प्रसंगी नगरसेवक संजय मेंढे, नगरसेविका बबिता संजय मेंढे, नगरसेवक गणेश माळी, नगरसेवक पंकज म्हेत्रे जि. प. सदस्य सौं मंदा माळी सरकारी वकील सौं दीपा चौदीकर तसेच पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, डॉकटर, इंजिनियर यांचे सत्कार करण्यात आले .यावेळी शाल,स्मृतीचिन्ह व विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन हे सत्कार करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी द्राक्षगुरु वसंतराव माळी, संस्थापक सदस्य संघटक तुकाराम माळी,अण्णासाहेब माळी, दत्तात्रय साखरे गणपतराव बेलकूड राजेंद्र माळी,वसंतराव चौदीकर, अशोक इरळे रणजित इरळे, बबनराव भंडारे, यशवंत माळी,संजय बेडगे, शिवाजी दुर्गाडे आदी मान्यवर उपस्थित होते . सूत्रसंचालन महादेव माळी वं सौ स्मिता माळी यांनी केले



