अखिल लिंगायत माळी समाजोन्नती परिषद, सांगलीच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व गुणीजन सत्कार समारंभ उत्साहात पार

Spread the news

सांगली- अखिल भारतीय लिंगायत माळी समाजोन्नती परिषद, शिवप्रसाद नागरी सह.पतसंस्था मर्या.,सांगली व शिवप्रसाद विकास परिषद,सांगली यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकत्याच पार पडल्या. याप्रसंगी माळी समाजातील गुणवंत विविध शैक्षणिक विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचा गुणगौरव समारंभ तसेच माळी समाजातील निवडून आलेले लोकप्रतिनिधी, शासकिय निमशासकिय पदावर नियुक्ती, पदोन्नती, तसेच विविध क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणा-या समाज बांधवांचा सत्कार समारंभ पार पडला. सदर गौरव समारंभाचे अध्यक्ष कवी,लेखक प्रा.भिमराव धुळुबुळू (सर),मिरज हे होते तर प्रमुख पाहुणे युवा उद्योजक मा.सूरज साखरे,सांगली हे होते.

­

 

प्रथम सत्रात सर्व संस्थांच्या वार्षिक सभा खेळाळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या सुरवातीस दिपप्रज्वलन व प्रतिमापुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करणेत आल्यानंतर उद्योजक श्री उमाकांत माळी स्वागत व प्रस्ताविक केले, त्यानंतर सभेच्या विषय पत्रिकानुसार सर्व सभा खेळी मेळीत पार पडल्या. दुस-या सत्राची सुरुवात अध्यक्ष माजी महापौर श्री विजयराव धुळूबुळू यांच्या स्वागत व प्रास्तावने झाली. त्यावेळी त्यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला व आजच्या सभेस दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबाबत सर्व उपस्थितांचे आभार मानले व प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा परिचय करून देऊन त्यांचा सत्कार केला.

  •  

त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रा.भिमराव धुळूबुळू यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केल. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे उद्योजक मा.सूरज साखरे यांनी आपल्या मनोगतामध्ये भावी पिढीने त्यांच्या उत्कर्षासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. त्यानंतर गौरव समारंभ पार पडला त्यामध्ये निवडून आलेले महानगरपालिका नगरसेवक, श्री. संजय मेंढे, सौ. बबिता मेंढे, श्री गींश माळी, श्री. पंकज म्हेत्रे, जि.प.सदस्या सौ. मंदा माळी, पंचायत समिती सदस्य, विविध नगरपालिकेचे नगरसेवक, सरपंच, यांच्या विविध स्पर्धापरीक्षांमधून विविध क्षेत्रात निवड झालेले समाज बांधव, नियुक्ती, पदोन्नती ,विविध पुरस्कार प्राप्त समाज बांधव आणि विशेष गुणवंता प्राप्त विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचा सत्कार उपस्थित मान्यवर व सर्व संस्थांचे पदाधिकारी यांच्या हस्ते करणेत आला. सदर समारंभास श्री दत्तात्रय साखरे, उद्योजक श्री अशोक इरळे, श्री वसंतराव चौदीकर, श्री पी,टी.माळी, इंजि.आण्णासो माळी, पत्रकार श्री गुरुबाळ माळी, श्री तुकाराम माळी, द्राक्षगुरु श्री वसंतराव माळी, उद्योजक श्री राजेंद्र माळी, श्री संजय बेडगे, श्री गणपती बेळकुड, श्री बबनराव भंडारे यांच्या सह संस्थांचे सभासद संचालक, पदाधिकारी व माळी समाजातील समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!