नवा विक्रम विधानसभा निवडणुकीतील सर्वोच्च मताधिक्यांचा….!
श्रीमती सुनेत्राताई पवार यांचे सर्वोच्च मतांधिक्यांच्या विक्रमाबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिनंदन
देवगिरी निवासस्थानी घेतली भेट
मुंबई, दि. ४:
उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून सबंध देशातील विधानसभेच्या निवडणुकांमधील सर्वोच्च मताधिक्यांचा विक्रम आज मोडला. देशातील विधानसभा निवडणुकीतील तब्बल २,१८,९३० या त्यांच्या नव्या सर्वोच्च मताधिक्यांच्या विक्रमाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले. तसेच; पार्थ पवार यांचेही अभिनंदन केले.




