Spread the news

नसरापूर, पुणे येथे ४ वर्षीय चिपुरडीवर झालेल्या बलात्काराच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ शिवतीर्थ (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथे भारतीय जनता पार्टी लक्ष्मीपुरी मंडल मार्फत बलात्कारी नराधमाचा एन्काऊंटर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यासाठी निदर्शने आणि आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चिमुरडीमार्फतच फाशी देण्यात आली. अशा संतापजनक घटनेला कोणतीही माफी किंव्हा दयामाया न दाखवता सरकारने अशा घटनांसाठी तात्काळ जनतेचा रोष लक्षात घेता कडक निर्णय घ्यावा आणि एन्काऊंटरच करावा अशी ही घटना असल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. अशा नराधमांचा चौरंगा करून त्याला कायमस्वरूपी सकाळ संध्याकाळ चौकात बसवावे अशा भावना सुद्धा व्यक्त करण्यात आल्या. या मागण्या नूतन मांडलाध्यक्षा रश्मी निवासराव साळोखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी श्री प्रसाद जाधव, श्री महेश यादव, श्री अवधूत श्रीराम भाट्ये यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सौ. मेघा क्षीरसागर, सौ. हौसाबाई सुतार, सौ.जयश्री वायचळ, सौ. स्वप्नाली पोतदार, श्री सुरेश गुजर, श्री सुजित मोरे, श्री सुहास सदलगे, श्री अतुल चव्हाण, श्री सुनील बोंगाळे श्री विकास माने, तसेच ज्येष्ठ हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्री दिलीप भिवटे काका, प्रसाद सांगावकर उपस्थित होते.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!