महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आमचे लाडके पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विशेष अभिषेक करण्यात आला.
आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करून मा. पक्षप्रमुखांना उदंड, निरोगी व दीर्घायुष्य लाभो, अशी मनोकामना व्यक्त केली!
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विराज हिंदुराव पाटील, शहरप्रमुख मंजित माने, शहरप्रमुख विशाल देवकुळे, उत्तर शहरप्रमुख रीमा देशपांडे, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, तालुकाप्रमुख विनोद खोत, रणजीत आयरेकर, दिनेश साळोखे, सातापा शिंगे, अरुण अब्दागिरी, विद्या गायकवाड, हर्षल पाटील, सुनील जोशी, शंकर खोत, शुभांगी साळोखे, युवासेनेचे योगेश लोहार, आणि प्रसन्ना अवटी यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
॥ जय महाराष्ट्र ॥
– आपला,
विराज हिंदुराव पाटील
(जिल्हाप्रमुख – शिवसेना, कोल्हापूर)




