गोखले कॉलेजमध्ये इंटर स्कूल व कॉलेज वादविवाद स्पर्धेमध्ये माध्यमिक विभागात श्री. शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पेठवडगांव प्रथम व ज्युनिअर कॉलेज विभागामध्ये गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला
कोल्हापूर – दि. 02 गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमध्ये श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन, इंन्डियन वुमन सायंटिस्ट असोसिएशन आणि गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर यांच्या वतीने संयुक्त रित्या इंटर स्कूल व कॉलेज वादविवाद स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाली. स्वागत व प्रास्ताविक शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन व युवती सचेतना फौंडेशनच्या अध्यक्षा प्रोफेसर डॉ. मंजिरी अजित मोरे यांनी केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. वी. भुयेकर होते.
मा. डॉ. आर. व्ही. गुरव (वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख व सायंन्स विभाग डीन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), प्रा. डॉ. मंजिरी मोरे, सौ. त्रऋतुजा पृथ्वी मोरे, (सचिव सुशिला देवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन) यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्राध्यापक डॉ. मंजिरी मोरे यांच्या हस्ते रेमरु व पुष्पगुच्छ देवून डॉ. आर. व्ही. गुरव यांचा सत्कार करणेत आला. प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून डॉ. मंजिरी मोरे व सौ. ऋतुजा मोरे यांचा सत्कार करणेत आला.
प्रमुख पाहुणे डॉ. आर. व्ही. गुरव यांनी बोलताना वादविवाद स्पर्धा ही केवळ बोलण्याची स्पर्धा नसून विचार करणेची, तर्क मांडण्याची आणि समोरच्याचे विचार समजून घेण्याची कला आहे. एखादया विषयाचा विविध बाजून विचार करणेची सवय लागते त्यामुळे विचारशक्ती प्रगल्भ बनते आपले मत योग्य उदाहरणे व कारणांसह मांडण्याची क्षमता विकसित होते. स्पर्धेमुळे आत्मविश्वास वाढून भाषा कौशल्य वाढते श्रवणाची सवय लागते निर्णय क्षमता, संवाद कौशल्य आणि नेतृत्वाची भावना विकसित होवून सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांची जाणीव होते. संवादाने सर्व प्रश्न सुटतात म्हणून आजच्या काळात वादविवाद स्पर्धाचे सतत आयोजन करणेची गरज आहे असे मत व्यक्त केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
माध्यमिक विभाग
:- प्रथम क्रमांक: श्री शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कागल
फस्ट रनर :- न्यायमुर्ती रानेडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सेनापती
कापशी
उच्च माध्यमिक विभाग
प्रथम क्रमांक: गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर
फस्ट रनर :- वडगांव विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडगांव
विजेत्या शाळांना प्रोफेसर डॉ. मंजिरी मोरे, सौ. ऋतुजा मोरे, सौ. शितल कदम, सौ. सुनंदा नाईक आणि श्री. अनिल शिंगे यांच्या हस्ते ट्रॉफी रोख रक्कम प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास परीक्षक म्हणून श्री. अमोल शिंगे, सौ. सुनंदा नाईक, सौ. शितल कदम, प्रा. डॉ. आर.एम.बिसुरे, डॉ. सी. आर. चौगुले यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळोच सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, पेटून कौन्सिल मेंबर दौलत देसाई, प्रशासन अधिकारी श्री. पृथ्वी अजित मोरे, कौन्सिल सदस्य प्रा. पी. बी. झावरे, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, उपप्राचार्या सौ. आर. एस. यादव, पर्यवेक्षक एम.एल. धनवडे यांनी उपस्थित राहून विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. के. के. पाटोळे, प्रा.डॉ. एस.एस.लेंडवे, सौ. एस.एस. नागन्नावर, सौ. जे.यु.कुंभार, सौ. आर.एम.पाटील, सौ.एस.पी. कवठेकर, सौ. मनिषा हातगीने, सौ. डॉ. वाय.ए.पाटील, प्रा. कांबळे मॅडम तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन प्रा.ए.यु.पडवळ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन प्रा.डॉ. पी. डी. आवटे यांनी मानले



