जुन्या पेन्शनसाठीच्या मोर्चामध्ये कुटुंबियांसह शिक्षकांनी सामील व्हावे : शिक्षक नेते भरत रसाळे
कोल्हापूर :जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून शिक्षक दिनी होत असलेल्या मूक मोर्चामध्ये शिक्षकांनी आपल्या कुटुंबियासह मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष शिक्षक नेते भरत भरत
रसाळे यांनी केले आहे .
भरत रसाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,१ नोव्हेंबर २००५ पूर्वी विना अनुदान/ अंशतः अनुदानावर व त्या नंतर १००% अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना कोणतीच पेन्शन योजना लागू नाही . त्यामुळे त्यांच्या भवितव्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे .
त्यामुळे १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमानुसार १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू होणे आवश्यक आहे .पण शासन ही पेन्शन योजना लागू करण्यास टाळाटाळ करत आहे . याच्या निषेधार्थ व जुनी पेन्शन लागू करावी या प्रमुख मागणीसाठी आज दि.५ सप्टेंबर २०२६ शिक्षक दिनी दसरा चौक येथून दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूकमोर्चा आंदोलनाचे नियोजन केले आहे .तरी कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी आपल्या कुंटुंबियासह मोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे यांनी केले आहे .
…….



