कोल्हापुरात इस्कॉनचा श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहात

Spread the news

कोल्हापुरात इस्कॉनचा श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहात
दोन दिवसांत सुमारे २० हजार भाविकांची उपस्थिती; अभिषेक, प्रवचन, दर्शन व हरिनाम संकीर्तनाने वातावरण भक्तिमय

­

 

कोल्हापूर : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त कोल्हापूर इस्कॉनच्या श्री श्री राधा माधव मंदिरात ३ व ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. दोन दिवसांच्या या महोत्सवाला सुमारे २० हजार भाविकांनी उपस्थिती लावत भगवान श्रीकृष्णाचे दिव्य दर्शन घेतले.

  •  

महोत्सवादरम्यान महाअभिषेक, आरती, हरिनाम संकीर्तन आणि महाप्रसाद यांसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्रीमान राधागोपीनाथदास ब्रह्मचारी यांनी श्रीकृष्णाच्या विविध लीलांवर आधारित केलेल्या सुश्राव्य प्रवचनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या महाअभिषेक व आरतीच्या वेळी मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला.

मधुर हरिनाम संकीर्तनाच्या तालावर भाविकांनी उत्स्फूर्तपणे नृत्य करीत आनंद व्यक्त केला. मंदिर परिसरात उभारण्यात आलेले आध्यात्मिक स्टॉल्स, गिफ्ट शॉप्स तसेच ‘माधव’ फूड स्टॉल्स हेही भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.

कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भाविकांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद घेतला. संपूर्ण महोत्सव भक्ती, आनंद आणि उत्साहाने भारलेला राहिला. इस्कॉन कोल्हापूरच्या वतीने महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी भाविक, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!