Spread the news

गर्जना श्रमिक संघ कामगारांच्या प्रश्नांसाठी तत्पर; किमान वेतनाबाबत प्रशासनाची ठाम भूमिका

­

 

गडहिंग्लज : कंत्राटी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या गर्जना श्रमिक संघाच्या वतीने गडहिंग्लज नगरपरिषदेतील कंत्राटी कर्मचारी व सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दयानंद ढेकळे यांना निवेदन देण्यात आले.

  •  

या निवेदनामध्ये शासनाने निश्चित केलेले किमान वेतन तात्काळ लागू करणे, मागील कालावधीतील वेतन फरकाची थकबाकी अदा करणे, PF व ESIC नियमित जमा करणे, दरमहा वेतन पावती देणे, वेळेत वेतन अदा करणे, साप्ताहिक सवेतन सुट्टी, ओव्हरटाईमचे वेतन, सुरक्षा साधने व गणवेश, महिला कामगारांना कायदेशीर सुविधा तसेच कामगारांच्या तक्रारींसाठी प्रभावी निवारण व्यवस्था आदी विविध मागण्या करण्यात आल्या.

यावेळी गडहिंग्लज नगरपरिषद प्रशासनाने कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत, प्रशासन कामगारांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे स्पष्ट केले. तसेच आगामी “नवीन टेंडर” शासनाच्या किमान वेतनाच्या नियमांनुसारच काढण्यात येईल आणि त्यामध्ये किमान वेतनाच्या बाबतीत कोणताही बदल केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

कामगारांच्या इतर मागण्यांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असून, संबंधित प्रश्नांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली.

गर्जना श्रमिक संघाने केवळ निवेदन देऊन थांबण्याऐवजी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका घेतली आहे. कंत्राटी कामगारांचे वेतन, PF-ESIC, सुरक्षित कामाचे वातावरण, कायदेशीर सुविधा आणि रोजगारातील सातत्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर संघ भविष्यातही ठामपणे लढा देणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

“कामगारांच्या हक्कांवर अन्याय झाला, तर गर्जना श्रमिक संघ शांत बसणार नाही; न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार!” अशी ठाम भूमिका संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!