Spread the news

*’शाहू’च्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कुमार व कनिष्ठ गटात १५०मल्लांची नोंदणी*
*बुधवारी (ता.२६)महिला व पुरुषांच्या सिनियर गटातील लढती*
कागल, प्रतिनिधी : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यातर्फे आयोजित मॅटवरील कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कुमार व कनिष्ठ गटात १५० मल्लांनी नोंदणी केली. पहिल्या दिवशी झालेल्या बालगटातील लढतींसह कुमार व कनिष्ठ गटातील सामन्यांनाही मल्ल व कुस्तीशौकिनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी या कुस्ती स्पर्धेला सुरुवात केली. त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनातून ही स्पर्धा सलग ४०व्या वर्षी होत आहे.
बुधवारी (ता.२६) पुरुषांच्या वरिष्ठ तसेच महिला गटातील लढती रंगणार आहेत. ‘महाखेल-कुस्ती हेच जीवन’ या फेसबुक पेज व यूट्यूब चॅनेलवरून स्पर्धेचे ऑनलाइन प्रक्षेपण केले जात असून त्यालाही कुस्तीशौकिनांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, पहिल्या दिवशीच्या बालगटातील तसेच दुसऱ्या दिवशीच्या कुमार व कनिष्ठ गटातील तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढती पूर्ण झाल्या.
बालगटातील अंतिम फेरीतील व तिसरा क्रमांक मिळविलेल्या मल्लांची नावे अशी आहेत.
२४ किलो : मयुरेश इंगळे (गोरंबे), आरव लाटे (तळंदगे), विराट पाटील (दिंडनेर्ली), स्वराज्य धनगर (तळंदगे).
२६ किलो : साई पोवार (सिद्धनेर्ली), आदित्य मोरबाळे (चिमगाव), संस्कार शिनगारे (तळंदगे), वैभव बडीगरे (पाचगाव).
२८ किलो : ऋतुराज हजारे (तळंदगे), श्रेयश पाटील (केनवडे), साहिल मालवेकर (सावर्डे), वेदांत मुरगुडे (तळंदगे).
३० किलो : श्रीतेज मगदूम (सिद्धनेर्ली), अरिहंत पाटील (यळगुड), विश्वजीत शिनगारे (तळंदगे), रुद्र लोंढे (कळंबा).
३२ किलो : रुद्र पाटील (बानगे), विश्वराज पाटील (सुरूपली), अरजान पैलवान (मुरगूड), आयुष पाटील (सिद्धनेर्ली).
३५ किलो : अभिमन्यू पाटील (केनवडे), साईराज सुळगावे (एकोंडी), वरद क्षीरसागर (मुरगूड), संग्राम शिनगारे (तळंदगे).
३८ किलो : समर्थ जाधव (यळगुड), हर्षवर्धन डाफळे (पिंपळगाव बुद्रुक), प्रतीक सोनवणे (तळंदगे), संस्कार धनगर (कागल).
४१ किलो : समर्थ खंदारे (सुरूपली), पृथ्वीराज सूर्यवंशी (पिंपळगाव बुद्रुक), राजवीर पवार (कागल), यश खोंद्रे (एकोंडी).
छायाचित्र : कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेतील लढतीचा एक थरारक क्षण.

­

 

चौकट : चित्रमय इतिहास; ‘शाहू’च्या कुस्ती योगदानाची साक्ष

  •  

स्पर्धास्थळी शाहू साखर कारखान्यातर्फे आयोजित मॅट व मातीवरील कुस्ती मैदानांतील क्षणचित्रे, विविध उपक्रम, मान्यवरांची उपस्थिती तसेच कारखाना मानधनधारक खेळाडूंनी मिळविलेली पदके व प्रशस्तीपत्रके यांची माहिती देणारे जुने फोटो स्वतंत्र दालनात प्रदर्शित करण्यात आले आहेत.या दालनात संस्थापक स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्यासह माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीतील छायाचित्रांचा समावेश आहे. कारखाना मानधनधारक खेळाडूंची पदके व प्रशस्तीपत्रकेही येथे ठेवण्यात आली आहेत. या दालनाला भेट देत कुस्तीशौकिनांनी ‘शाहू’च्या कुस्तीच्या वाटचालीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!