*कचऱ्यात सापडलेले सोन्याचे गंठण* *प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कोल्हापूर मनपाच्या सफाई दूतांचा नगरसेवक आश्किन आजरेकर यांच्या हस्ते सत्कार व रोख बक्षीस देऊन गौरव*

Spread the news

*कचऱ्यात सापडलेले सोन्याचे गंठण* *प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कोल्हापूर मनपाच्या सफाई दूतांचा नगरसेवक आश्किन आजरेकर यांच्या हस्ते सत्कार व रोख बक्षीस देऊन गौरव*
*​कोल्हापूर*:*

­

 

प्रभाग क्रमांक १२ मधील परिसरामध्ये कचऱ्यात सापडलेले सोन्याचे मौल्यवान गंठण प्रामाणिकपणे मूळ मालक महिलेला परत करून सचोटीचा आदर्श निर्माण करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष सफाई दूतांचा शिवसेना नगरसेवक आश्किन गणी आजरेकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला, तसेच त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

  •  

​शुक्रवार, दिनांक १८ रोजी प्रभाग क्रमांक १२ च्या कार्यक्षेत्रात नियमित कचरा संकलनाचे काम सुरू असताना एका महिलेचे सोन्याचे दागिने (गंठण) नजरचुकीने कचऱ्यात गेले होते. कचरा गोळा करत असताना महापालिकेच्या सतर्क सफाई कर्मचाऱ्यांना हे गंठण निदर्शनास आले. कोणताही लोभ अथवा मोह न बाळगता त्यांनी तत्काळ खातरजमा करून ते सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे संबंधित महिलेच्या स्वाधीन केले.

​या प्रामाणिक आणि आदर्श कृतीची दखल घेत नगरसेवक आश्किन आजरेकर यांनी या सर्व सफाई दूतांना संपर्क कार्यालयात पाचारण करून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि रोख बक्षीस देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.

​याप्रसंगी बोलताना नगरसेवक आश्किन आजरेकर म्हणाले, “महानगरपालिकेचे सफाई दूत ऊन, पाऊस किंवा संकटाची तमा न बाळगता शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र राबत असतात. अशा बिकट परिस्थितीतही अत्यंत प्रामाणिक राहून सोन्याचे मौल्यवान दागिने परत करणे ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे संपूर्ण कोल्हापूर महानगरपालिकेची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांच्या या प्रामाणिक वृत्तीला प्रोत्साहन मिळावे म्हणूनच हा सत्कार व रोख बक्षीस देण्यात आले.”

​या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रभाग क्रमांक १२ चे सॅनिटरी इन्स्पेक्टर मनोज लोट, महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय मुकादम, कर्मचारी वर्ग आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

​आपला नम्र,
आश्किन गणी आजरेकर
नगरसेवक – शिवसेना – कोल्हापूर महानगरपालिका
8237795559


Spread the news

You may also like

error: Content is protected !!