एआयएसएसएमएस औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात ‘सिनॅप्स’ राष्ट्रीय संशोधन स्पर्धेचे आयोजन

Spread the news

एआयएसएसएमएस औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात ‘सिनॅप्स’ राष्ट्रीय संशोधन स्पर्धेचे आयोजन
पुणे : एआयएसएसएमएस औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, पुणे आणि इंडस बायोटेक प्रा. लि.
यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायनॅप्स’ (SYNAPSE) या द्वैवार्षिक राष्ट्रीय संशोधन स्पर्धेचे आयोजन ७
ऑक्टोबर २0२६ रोजी करण्यात आले. या स्पर्धेला देशातील विविध राज्यांतील
औषधनिर्माणशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात उद्घाटन
समारंभाने झाली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.
देविदास वायदंडे यांनी प्रमुख व्याख्यानातून संशोधन, नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद
केले. तरुण संशोधकांना मार्गदर्शन करताना त्यांनी नावीन्यपूर्ण विचार आणि संशोधनाची गरज
अधोरेखित केली. शिक्षण व संशोधन क्षेत्रात उत्कृष्टता साध्य करण्याच्या एआयएसएसएमएस
औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या ध्येयाशी हा उपक्रम सुसंगत ठरला. या स्पर्धेत पदवी आणि
पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या संशोधन प्रकल्पांचे
सादरीकरण केले. औषधनिर्माण क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांच्या परीक्षक मंडळाने संशोधन
प्रकल्पांचे मूल्यमापन केले. संपूर्ण दिवस संशोधन पद्धती, नावीन्यपूर्ण संकल्पना आणि वैज्ञानिक
दृष्टिकोन यांवर विचारांची देवाणघेवाण झाली. कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात पार
पडलेल्या पारितोषिक वितरण व समारोप समारंभाने झाली. वाय. बि. कॉलेज ऑफ फार्मसी,
छत्रपती संभाजी नगरच्या टीमला विजेते आणि दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले, तर इंदिरा
कॉलेज ऑफ फार्मसी, विषुपुरी नांदेडच्या टीमला PG वर्गात प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले. UG
वर्गातून, डॉ. डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी, डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ
फार्मसी, मुंबईची टीम पहिली उपविजेता आणि दादासाहेब बाळपांडे कॉलेज ऑफ फार्मसी,
नागपूरची टीम दुसरी उपविजेता ठरली. विजेत्या संघांना आकर्षक रोख पारितोषिके, स्मृतिचिन्हे
आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. एआयएसएसएम सोसायटीचे मानद सचिव श्री.
मालोजीराजे छत्रपती आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अश्विनी आर. माडगुळकर यांनी सर्व
विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील संशोधन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

­

 

पदव्युत्तर (PG) गटामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील वाय. बी. कॉलेज ऑफ फार्मसीच्या संघाने
प्रथम व तृतीय क्रमांक पटकावला, तर नांदेड येथील विष्णुपुरीच्या इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या
संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.
पदवी (UG) गटामध्ये आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या संघाने प्रथम
क्रमांक, मुंबई येथील डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसीच्या संघाने द्वितीय क्रमांक, तर
नागपूर येथील दादासाहेब बलपांडे कॉलेज ऑफ फार्मसीच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नावीन्यपूर्ण विचारांना प्रोत्साहन देणारा
हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!