ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या डॉ. विनायक बैरागी यांचा जागतिक
पातळीवरील टॉप 2% शास्त्रज्ञांमध्ये समावेश
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया आणि एल्स वेअर पब्लिशिंग हाऊस यांच्याकडून दरवर्षी सी-
स्कोर, व हाय -इंडेक्स, संशोधन व नवनिर्मिती यांचा विचार करून टाॅप 2% जागतिक शास्त्रज्ञांची
यादी प्रसिद्ध केली जाते. यावर्षी 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या या जागतिक
यादीमध्ये ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
मधील डॉ. बैरागी यांचे नाव प्रसिद्ध झाले आहे.
डॉ. विनायक बैरागी यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता व इमेज प्रोसेसिंग हा विषय असून ते गेली 13 वर्षे
सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात प्रोफेसर आणि संशोधक
म्हणून काम करीत आहेत.
जागतिक स्तरावरील टाॅप 2% स्तरावरील शास्त्रज्ञांमध्ये ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल
सोसायटीचे नाव उंचावले आहे. त्यामुळे प्राचार्य डॉ. पी बी माने आणि संस्थेचे सचिव श्री
मालोजीराजे छत्रपती यांनी त्यांचे अभिनंदन केले.



