*अथणी शुगरचे यंदा ५.५० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : श्री योगेश पाटील*
बांबवडे वार्ताहर :
बांबवडे येथील येथील अथणी शुगर्स साखर कारखान्याचा सन २०२६-२७ गळीत हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन नुकताच चिफ केमिस्ट श्री मारुती पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चना पाटील या उभयतांच्या हस्ते विधिवत पूजेने पार पडला.
या समारंभाच्या वेळी एक्यु. डायरेक्टर श्री योगेश पाटील म्हणाले, सन २०२६-२७ गळीत हंगामासाठी कारखान्यातील सर्व कामे पूर्ण झाली असून यंदा ५.५० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखाना लवकरच सुरु करण्यात येणार आहे. अथणी शुगर्स माध्यमातून एफ.आर.पी.पेक्षा जादा ऊस बिल व तोडणी वाहतूक बिल वेळेत देण्याची परंपरा कायम जोपासली आहे. या ही वर्षी सालाबाद प्रमाणे सर्व बिल इतर कारखान्याच्या बरोबरीने वेळेत देण्याचा मानस आहे. चालू वर्षी राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करुन सहकार्य करावे. ही अपेक्षा आहे.
यावेळी उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष श्री मानसिंगराव गायकवाड व इतर संचालक, युनिट हेड रवींद्र देशमुख, कार्यकारी संचालक भगवान पाटील, चीफ अंकौंटट भानुदास पाटील, चीफ इंजिनियर शिवाजी बंडगर, प्रशासनाचे जगन्नाथ जोशी, लेबर ऑफिसर उमेश हांडे, सुरक्षा अधिकारी पवार, व इतर सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी वृंद यांची प्रमुख उपस्थितीत होते.
सदर समारंभाचे आभार श्री नितीन सुतार यांनी मानले.



