कोल्हापुरात भाजपच्या नगरसेवकला दिलासा, विजय देसाई यांचे जातवैधता प्रमाणपत्र उच्च न्यायल्याकडून वैध

Spread the news

कोल्हापुरात भाजपच्या नगरसेवकला दिलासा, विजय देसाई यांचे जातवैधता प्रमाणपत्र उच्च न्यायल्याकडून वैध

­

 

कोल्हापूर:

  •  

मुंबई न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच कडून प्र. 9 मधील भाजपचे नगरसेवक विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांचे जात वैधता प्रमाणपत्र हे वैद्य ठरवण्यात आले आहे. तसेच इतर मागास प्रवर्गातील जातवैधता समितीने अवैध ठरवलेला आदेश रद्द करून दोन आठवड्यात जात वैधता प्रमाणपत्र देसाई यांना देण्याच्या आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख व नीरज धोटे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत.

जानेवारी महिन्यात झालेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मधून विजयसिंह ऊर्फ रिंकू देसाई हे भाजपकडून इतर मागास प्रवर्गातून विजयी झाले होते. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नंदकुमार पिसे यांचा पराभव झाला होता. दरम्यान, देसाई यांच्या इतर मागास प्रवर्गाच्या दाखल्यावर पिसे यांनी जात वैधता समितीकडे हरकत घेतली होती. या हरकतीवरून 25 जून 2026 रोजी जात वैधता समितीने देसाई यांचा दाखला अवैध ठरवला होता.

जात वैधता समितीच्या आदेशावरून कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडून 3 ऑगस्ट रोजी देसाई यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. त्यानंतर देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे जात वैधता समिती आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आदेशाला आव्हान दिले होते. देसाई ऍड. आर. के महेंद्रकर यांनी बाजू मांडली. देसाई यांनी दिलेल्या पुराव्याच्या आधारे गेल्या तीन महिन्यापासून सर्किट बेंच येथे युक्तिवाद सुरू होता.

याची अंतिम सुनावणी 19 ऑक्टोबर रोजी पार पडली.यावेळी न्यायलायकडून जात वैधता समितीने दिलेला आदेश रद्द ठरवला आहे. तर कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांनी दिलेला नगरसेवक रद्द केलेला आदेश देखील न्यायालयाकडून रद्द करण्यात आला. तर जात वैधता समितीला देसाई यांचा इतर मागास प्रवर्गातील जात पडताळणी दाखला दोन आठवड्यात देण्याचे आदेश सर्किट बेंच कडून देण्यात आले आहेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!