वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या महाकवे येथील तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांच्या सांत्वनावेळी मंत्री हसन मुश्रीफ गहिवरले

Spread the news

*वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या महाकवे येथील तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांच्या सांत्वनावेळी मंत्री हसन मुश्रीफ गहिवरले*

­

 

*एकुलत्या मुलाच्या वडिलांसमोरच झालेल्या मृत्यूमुळे झाले भावुक*

  •  

*कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून करणार सर्वतोपरी मदत*
​
*म्हाकवे (ता. कागल) येथील कु. रणजीत सिद्राम पाटील या अवघ्या २८ वर्षीय शेतकऱ्याच्या मुलाचा दोनच दिवसापूर्वी वीज पडून मृत्यू झाला होता. पाटील कुटुंबीयांच्या सांत्वनाला गेलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांना वडील सिद्राम पाटील यांनी घटनेची हकीकत सांगितली. ते ऐकताच मंत्री श्री. मुश्रीफ गहिवरले. वडिलांसमोरच अवघ्या २८ वर्षीय कर्त्या मुलाच्या झालेल्या मृत्यूची वस्तुस्थिती ऐकून श्री. मुश्रीफ भावुक झाले.*
​
*यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कर्ता मुलगा गेल्यामुळे एकटे पडलेल्या पाटील कुटुंबीयांना समाजानेही सावरावे. मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनसह त्यांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्यही करू.*

*यावेळी वडील सिद्राम दत्तात्रय पाटील, आई सौ. आक्काताई सिद्राम मारूती पाटील, चुलते आनंदा मारुती पाटील, चुलते शिवाजी मारुती पाटील, माजी उपसरपंच रमेश पाटील, निवास पाटील, विजय पाटील, के. डी. पाटील, आदिनाथ पाटील, शहाजी पाटील, सदाशिव पाटील, अशोक पाटील ओमप्रकाश पाटील, दिलीप पाटील, शंकर पाटील, धोंडीराम पाटील, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
=======


Spread the news

You may also like

error: Content is protected !!