कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी राहुल नष्टे यांची निवड*

Spread the news

*कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी राहुल नष्टे यांची निवड*

­

 

*उपाध्यक्षपदी चंद्रकांत नासिपुडे*

  •  

कोल्हापूर दि. २३ : कोल्हापूर येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी कोल्हापूरातील प्रसिध्द व्यावसायिक राहुल अशोक नष्टे यांची तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत मल्लाप्पाण्णा नासिपुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक व संचालक नानासाहेब नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २०२६-२७ सालासाठी कार्यकारिणी निवड करण्यात आली.

या निवडीमुळे समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समाजाची एकजूट अधिक बळकट करुन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातील, असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नष्टे यांनी व्यक्त केला.

मावळते अध्यक्ष किरण गवळी गवळी यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!