*शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात*
*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा ठसा*
-प्रश्नमंजुषेत द्वितीय तर हिंदी वक्तृत्व स्पर्धेत चौथा क्रमांक
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या युवा महोत्सवामध्ये डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर या अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाने सांस्कृतिक आणि बौद्धिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत स्पर्धेवर ठसा उमटवला. प्रश्नमंजुषेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी द्वितीय तर हिंदी वक्तृत्व स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला.
जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, वादविवाद, हिंदी वक्तृत्व, इंग्रजी वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा या स्पर्धा प्रकारांत यश मिळवले. यानंतर मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे आयोजित मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धेत अथर्व मस्के, परीक्षित जाधव आणि श्रावणी चव्हाण यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच हिंदी वक्तृत्व स्पर्धेत नेहा जाधव हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर चौथा क्रमांक मिळवला. सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. मिलिंद वडगावे व डीन स्टुडंट अफेअर्स डॉ. आर. ए. पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संजय पवार, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांनी यशस्वी विद्यार्थी सांस्कृतिक विभाग, संघ व्यवस्थापक आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
*कोल्हापूर :* युवा महोत्सवात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, डॉ. संजय पवार, डॉ. लितेश मालदे, डॉ. आर. ए. पाटील, प्रा. मिलिंद वडगावे.



