गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करा

Spread the news

*गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करा*

­

 

*मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार राजेश पाटील यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी*

  •  

गडहिंग्लज, दि. ३:
गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करावा, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार राजेश पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. याबाबतचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी आग्रही मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

मंत्री श्री. मुश्रीफ व माजी आमदार श्री. पाटील यांनी मुंबईत मंत्री श्री. बावनकुळे यांना भेटून याबाबतचे लेखी निवेदन दिले आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिग्लज तालुका हा गेल्या अनेक महिन्यांपासून भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहे. पावसाचे अत्यल्प प्रमाण, पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि शेती पिकांचे झालेले मोठे नुकसान न्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

शसनाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नव्याने दोन तालुक्यांचा दुष्काळग्रत यादीत सामावेश केला आहे. परंतु गडहिंग्लज चा समावेश झाला नाही. त्यामुळे, तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकरी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, दसरा चौक, गडहिंग्लज येथे बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत.

या आंदोलनात शेतक-यांनी रस्त्यावरच चुली मांडून भाकरी भाजलेल्या आहेत व रस्त्यावरच बैलजोड्या बांधलेल्या आहेत, शेतकऱ्यांनी गडहिंग्लज शहरातूनच काढलेली लक्षवेधी घोडागाडी रॅली, शाळा व महीविद्यालयीन विद्यर्थ्याची फेरी आणि आठवडा बाजारात ‘भीक मागो’ आंदोलन याकडेही पत्राद्वारे लक्ष वेधलेले आहे.

*प्रमुख मागण्या……!*
माजी आमदार श्री पाटील यांनी पत्राद्वारे केलेल्या प्रमुख मागण्या अशा………..
□ गडहिंग्लज तालुक्याचा राज्यातील दुष्काळग्रत तालुक्यांच्या यादीत तात्काळ समावेश करावा.
□ तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणेला दुष्काळी उपाययोजना लागू करण्याचे आदेश यावेत.
□ टँकरने पाणीपुरवठा, चारा छावण्या, रोजगार हमीची कामे वाढवा.
□ शेतक-यांना पीकविमा, कर्जमाफी आणि आर्थिक मदत तात्काळ जाहीर करा.
…………

*मुंबई: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार राजेश पाटील यांनी गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, या मागणीचे निवेदन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले.*
===========


Spread the news

You may also like

error: Content is protected !!