केटरिंग व्यावसायिकावर हल्ला केलेल्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची केटरिंग संघटनेची पोलीस अधीक्षकाकडे मागणी
कोल्हापूर
केटरिंग व्यावसायिकावर हल्ला केलेल्या हल्लेखोरावर खडक कारवाई करावी अशी मागणीकोल्हापूर केटरर्स वेलफेअर असोसिएशन कोल्हापूर अशी मागणी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे
निवेदनात म्हटले आहे की, ९ जून रोजी पहाटे कामाचे ठिकाणी रोजंदारी कर्मचारी दारू पिताना आढळल्यानंतर त्यांना दारू पिण्यास मज्जाव केल्याच्या रागातून केटरर्सचे मालक यांचेवर रामकृष्ण हॉल लोणार वसाहत येथे आपल्या मित्रांसोबत येऊन सशस्त्र हल्ला झाला. यामध्ये कोल्हापूर कॅटर्स वेलफेअर असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष व सिद्धराज केटरर्स चे मालक श्री विवेक विश्वनाथ शिंदे व त्यांचे कर्मचारी श्री राहुल धनपाल शेंडे व श्री अमोल मनोहर मानकापुरे हे जखमी झाले आहेत. सदर गुन्ह्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहे.
तसेच हॉटेल , बार , खाद्य प्येय विक्रेते , मंगल कार्यालय , उद्योजक , व्यापारी अशा सर्व प्रकारचे व्यावसायिकांना कमी अधिक प्रमाणात अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते . काही लोक आपले व व्यवसायाचे नाव बदनाम होण्याचे भीतीने अशा प्रसंगांची वाच्छता करत नाहीत . अशा विघातक , अपप्रवृत्तींना आळा बसावा व प्रशासनाची जरब रहावी यासाठी सदर घटनेतील आरोपींवर कायदेशीर कठोर कारवाई करावी.
कोल्हापूर केटरर्स वेलफेअर असोसिएशन कोल्हापूर
सहभागी संघटना :
कोल्हापूर हॉटेल मालक संघ
कोल्हापूर बार असोसिएशन
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स
मंगल कार्यालय असोसिएशन
कोल्हापूर जिल्हा मंडप लाईट डेकोरेटर्स असोसिएशन
कोल्हापूर जिल्हा साऊंड लाईट असोसिएशन
इव्हेंट मॅनेजमेंट असोसिएशन एजन्सीज
इव्हेंट मॅनेजमेंट अँड प्लॅनर्स असोसिएशन