गुजरात विमान दुर्घटनेतील मृतांप्रती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त केले

Spread the news

*गुजरात विमान दुर्घटनेतील मृतांप्रती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त केले

 

 

 

  •  

कोल्हापूर दिनांक 12
गुजरात विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित शुभेच्छा कार्यक्रम रद्द केला. दुर्घटनेतील मृतांप्रती दुःख व्यक्त केले.
मंत्री चंद्रकांत पाटील हे नेहमी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात करतात. यावेळी ही त्यांनी शुभेच्छा रूपाने येणाऱ्या रकमेतून महिलांच्या आरोग्यासाठीच्या विविध उपक्रमांना मदत करण्याचा निश्चय केला होता. आज संध्याकाळी नागाळा पार्क येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात ते शुभेच्छा स्वीकारणार होते. मात्र गुजरात येथे विमान दुर्घटना पार्श्वभूमीवर त्यांनी हा समारंभ रद्द केला. ते कार्यालयात आले मात्र त्यांनी कोणाच्याही शुभेच्छा स्वीकारल्या नाहीत. यावेळी तेथे जमलेल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी दुर्घटनेतील मृतांप्रती अतीव दुःख व भावना व्यक्त केल्या.
यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, आमदार राहुल आवाडे, भाजपचे नेते सुहास लटोरे, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील,  निंबाळकर राहुल चिकोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!