आमदार अंमल महाडीक  यांनी क्रिडाई कोल्हापूरचे पदाधिकारी व सभासद यांच्या समवेत

Spread the news

 

 

  •  

 

 

आमदार अंमल महाडीक  यांनी घेतली क्रिडाई कोल्हापूरचे पदाधिकारी व सभासद यांच्या समवेत बैठक

कोल्हापूर, प्रतिनिधी

आमदार अंमल महाडीक  यांनी क्रिडाई कोल्हापूरचे पदाधिकारी व सभासद यांच्या समवेत क्रिडाई कोल्हापूरच्या सभासदांचे बांधकाम विषयक आणि कोल्हापूर शहराचे प्रलंबित प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी हॉटेल आयोध्या  येथे मिटींगचे आयोजन केले होते.या मिटींगमध्ये क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी.खोत यांनी खालील मुद्दे मांडले व त्यावरती सविस्तर चर्चा झाली.

 

या विषयावर झाली चर्चा:
१. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी शासनाकडून भरीव फंड आणावेत यावरती सविस्तर चर्चा झाली.
२. कोल्हापूरला सर्वोच्य न्यायालयाचे सर्किट बेंच होणार असून याचे लवकरात लवकर नोटिफिकेशन मा. मुख्यमंत्री यांना सांगून काढण्यात यावे.
३. आय. टी पार्क – आय. टी. पार्क असोसिएशनने एका मिटींग आम्हास बोलविले होते. या मिटींगमध्ये कोल्हापूर मध्ये जवळ जवळ १०० आय.टी. कंपन्या आहेत असे सांगितले. आपल्या मुलांना आय.टी. कंपनीत जॉबसाठी आज रोजी बाहेरच्या देशांत जावे लागते.जर शेंडा पार्क येथील जागेत आय. टी. पार्क झालेस आपल्या मुलांना कोल्हापूर मध्ये जॉब मिळून चागंले जिवन जगता येईल तेंव्हा आय. टी. पार्क होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
४. कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगर विकास विभागाकडे सहाय्यक संचालकांचे कायम स्वरूपी पद भरण्याबाबत प्रयत्न व्हावेत. त्यामुळे आपल्या सभासदांच्या व सामान्य नागरिकांच्या बांधकाम विषयक फाईली लवकरात लवकर मंजूर होतील. तसेच कोल्हापूर डी. पी. रोड विकसीत होण्याच्या दृष्टीने कायम स्वरूपी सहाय्यक संचालक नियुक्त होणे गरजेचे आहे.
५. कोल्हापूर शहराचा दुसरा विकास आराखडा सन २००० साली मंजूर झाला. सन २००५ व २०१९ साली कोल्हापूरला प्रचंड प्रमाणात पूर आला. त्यानंतर ब्लु व रेड लाईन आल्या. त्यामुळे पूर बाधित क्षेत्रातील रस्ते विकसीत झाल्यास जेव्हा पूर येईल त्यावेळी पुराचे पाणी रस्त्यावरून निघून जाईल त्यामुळे हे रस्ते होणे गरजेचे आहे. ब्लु लाईन टाकण्यापूर्वी डी क्लास नियमाप्रमाणे सदर भागात आमच्य काही सभासदांच्या प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली. परंतु या प्रकल्पांनां नविन नियमाप्रमाणे भोगवटा पत्र मिळावे तसेच जुन्या बिल्डींगचा पुनर्विकास करण्यासाठी मंजुरी द्यावी.
६. नागरी जमीन कमाल धारणा कायदा दि.२९/११/२००७ रोजी रद्द झाला आहे. त्यामधील कलम २० हे १९९९ च्या रिपिल आक्ट नुसार ठेवण्यात आले ते रद्द करण्यात यावे. येत्या डिसेंबर मध्ये होणाऱ्या अधिवेशनात ठराव मांडण्यात येवून पास करणेत यावा.
७. नागरी जमीन कमाल धारणा कायदा कलम २० अन्वये मंजूर करण्यात आलेल्या योजनांमधून मुख्यमंत्री कोट्यासाठी ५ टक्के प्रमाणे देय असलेल्या सदनिका शासनाने लाभार्थी न पाठवल्यामुळे आज रोजी विकासक/ बिल्डर यांच्याकडे अनेक वर्षांपासून पडून आहेत. सदर सदनिकांची खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी शासनाने रेडीरेकनर दराप्रमाणे १०० टक्के रक्कम भरण्याचे सुचविले आहे. तथापी गेली ३५ वर्षे अशा सदनिकांचे लाईट बिल,पाणी बिल,घरफाळा, मेंटेनन्स इत्यादी सर्वच गोष्टी बिल्डरच करत असल्याने त्यांना रेडीरेकनर दराने १०० टक्के पैसे भरणे हे जाचक व अडचणीचे आहे. तर रेडीरेकनर दराने होणाऱ्या किंमतीच्या १०टक्के इतकी रक्कम भरून सदरच्या सदनिका खुल्या बाजारात विक्री करणेस परवानगी मिळावी ही विनंती.
८ प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात श्री. सुधाकर चालावाढ साहेबांच्या बरोबर परवाच क्रिडाई कोल्हापूरच्या कार्यालयात मिटींग झाली. बाहेरच्या कंपन्या कोल्हापूरात येण्यासाठी प्रॉपर्टी टॅक्स कमी करणेत यावा.
९. रस्ते व गटर्सचे अंदाजपत्रक तयार करून अंदाजपत्रकाच्या ५०टक्के इतकी रक्कम घेण्याची अट रद्द करण्यात यावी.
१०. कोल्हापूर शहरातील ट्रॅफिक कमी करण्याच्या अनुषंगाने शहाराच्या विकास योजनेतील काही रस्ते विकसित करने अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता शासनाच्या नगरविकास विभागाकडून स्पेशल निधी मिळावा
11. कोल्हापूर विमानतळावर आपल्या सभासदांचे प्रोजेक्ट डिस्प्ले करण्यासाठी जागा मिळावी.तसेच विमानतळावर एक बुकलेट ठेवण्यात यावे त्यामध्ये कोल्हापूर व क्रिडाई कोल्हापूर ची माहिती ठेवण्यात यावी.
12. कोल्हापूर शहरात फ्लाय ओव्हर ब्रीज होणे गरजेचे आहे.
13. हेरिटेज व ट्री कमिटीवर नवीन तज्ञ नेमावेत.या कमिटीत क्रिडाई कोल्हापूरचा प्रतिनिधी असावा.
14. क्रिडाई कोल्हापूर ही नेहमीच कोल्हापूर शहराच्या विकासासाठी प्रयत्न करते. क्रिडाई कोल्हापूर कार्यालयासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची मोकळी जागा भाड्याने मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.
यानंतर मा.आमदार अमल महाडिक साहेबांनी वरील सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देताना सांगितले की, कोल्हापूरात हाय कोर्टाचे सर्किट बेंच होण्यासाठी लवकरच नोटीफिकेशन निघेल व एक चांगली बातमी मिळेल. शेंडा पार्कमधील किंवा शिवाजी विद्यापीठ मधील जागेसंदर्भात लवकरच येत्या 15 दिवसात निर्णय होईल. कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरविकास विभागाकडे कायम स्वरूपाचे सहाय्यक संचालक पद भरणे, टी.डी.आर.साठी एक वेगळी खिडकी, युएलसी बाबत सखोल अभ्यास करून महानगरपालिकेच्या अधिकारी यांना सांगणे, प्राॅपटी टॅक्स बाबत सविस्तर माहिती द्या, रस्ते व गटर अंदाजपत्रकात 50% रक्कम भरून घेण्याची अट रद्द करण्यात यावी या सर्वच बाबतीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक मॅडम यांचे बरोबर मिटींग घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे व सदर प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी सरकारकडून आदेश आणणेचे आश्वासन दिले.
तसेच कोल्हापूर शहर खड्डे मुक्त करण्याचे येत्या 15 दिवसात काम सुरु होईल, ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी ट्रॅफिक अधिकारी याच्याशी चर्चा करून सोडविण्यासाठी एक मिटींग घेऊ, कोल्हापूरामध्ये सरकारी डेंटल हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालायासाठी नवीन भव्य इमारतअशी लवकरची बातमी मिळेल, कोल्हापूर कचरा उठाव, हद्दवाढ, क्रिडा संकुल या सर्वच बाबी प्रधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. सध्याचे सरकार सकारात्मक असून आपण जे जे प्रश्न मांडलेत त्यांचा पाठपुरावा करत असल्याचे आमदार महाडिक साहेबांनी मान्य केले.
तसेच कोल्हापूर शहरातील कचरा डेपो बाहेर हलवण्याचा निकाल झाला असून कोल्हापूर शहरातील एस. टी. स्टँड बाहेर हलवणे, कोल्हापूर शहरातील रस्ते विकास करण्यासाठी नॅशनल लेव्हलच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी असे विविध प्रश्न सभासदांनी विचारले त्यास महाडिक साहेबांनी समर्पक उत्तरे दिली. टुरिझमच्या बाबतीत तुम्ही सूचना सुचवा त्या सोडविण्याचा निश्चितच प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले. क्रिडाई कोल्हापूर च्या पदाधिकाऱ्यांनी चित्रनगरीला भेट द्यावी. सध्या फिल्म इंडस्ट्रीजला येथील वातावरण नैसर्गिक परिथिती, शेजारी असणारा कोकण, कोल्हापूर विमानतळ, रेल्वे या सर्वच बाबतीत पोषक असल्या चे मा. आमदार साहेबांनी सांगितले.
आजच्या या मिटींगला क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव गणेश सावंत, क्रिडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विद्यानंद, बेडेकर, क्रिडाईचे कोल्हापूर चे माजी अध्यक्ष महेश यादव, क्रिडाई कोल्हापूर चे सहसचिव नंदकिशोर पाटील, निखिल शहा, सहखजानिस श्रीराम पाटील, सागर नांलग, संचालक सचिन ओसवाल,प्रदीप भारमल, आदित्य बेडेकर, चेतन चव्हाण, संदीप पोवार, संग्राम दळवी, अमोल देशपांडे, श्रीकांत पाटील, मौत्तीक पाटील, जेष्ठ सभासद श्रीनिवास गायकवाड, कृष्णा पाटील, अभिजीत मगदूम, धोंडीराम रेडेकर, शंकर गावडे, सुजय होसमणी,विवेकानंद पाटील, श्रीधर कुलकर्णी, संदीप मिरजकर तसेच युथ विंग चे प्रणव श्रीरसागर व सह समन्व्यक प्रतिक होसमणी व वूमेन्स विंग च्या समन्व्यक मोनिका बकरे व सदस्य हजर होते. सचिव गणेश सावंत यांनी सर्वाचे आभार मानले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!