‘शाहू’च्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत उच्चांकी ४२५मल्लांचा सहभाग महिला व पुरुष(वरिष्ठ) गटात रोमहर्षक लढती

Spread the news

*’शाहू’च्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत उच्चांकी ४२५मल्लांचा सहभाग*
*महिला व पुरुष(वरिष्ठ) गटात रोमहर्षक लढती*
*गुरुवारी (ता.२७)रंगणार अंतिम फेरीतील लढतींचा थरार*

­

 

कागल,प्रतिनिधी.
शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी येथे बुधवारी (ता.२६)महिला व पुरुष(वरिष्ठ) गटातील रोमहर्षक लढती झाल्या.महिला गटात६० तर पुरुष गटात ६४अशा एकुण एकशेहे चोवीस मल्लांची नोंदणी झाली.या आधीच्या तीनशे एक मल्लांसह उच्चांकी ४२५मल्लांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी या स्पर्धा सुरू केल्या.त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनातून या स्पर्धा सलग ४०व्या वर्षी संपन्न होत आहेत.
जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस,राजे बँकच्या अध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे,सौ.श्रेया घाटगे यांच्या हस्ते कुस्ती लावून आजच्या तिसऱ्या दिवशीच्या लढतींचा प्रारंभ झाला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक प्रा सुनील मगदूम, भाऊसाहेब कांबळे, संचालिका सौ.सुजाता तोरस्कर, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, शाहू कृषीच्या संचालिका सौ.जयश्री कोरवी.
आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सीनियर गटासह महिला विभागातील प्रेक्षणीय लढतींमुळे कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.ऑलम्पिकच्या धर्तीवरील अचूक व नेटक्या नियोजनामुळे पारदर्शकपणे या स्पर्धा पार पडत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले अनुभवी व नामवंत मल्ल पंच म्हणून काम पाहत आहेत.स्पर्धास्थळी येऊ न शकणाऱ्या शौकिनांसाठी महाखेल- कुस्ती हेच जीवन या फेसबुक व यूट्यूब चैनल वरून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे.

  •  

छायाचित्र-१) कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत सुरू असलेल्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेच्या तिस-या दिवशीच्या लढतींना कुस्ती लावून प्रारंभवेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस,राजे बँकच्या अध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे,सौ.श्रेया घाटगे, कारखान्याच्या संचालिका सौ. सुजाता तोरस्कर, शाहू कृषीच्या संचालिका सौ जयश्री कोरवी.

चौकट
*गुरुवारी (ता.२७)रंगणार अंतिम फेरीतील लढतींचा थरार*
मॕटवरील या कुस्ती स्पर्धेकडे मल्लांसह शौकिनांचे लक्ष लागून राहिलेले असते. या स्पर्धेतील विजेते मल्ल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. त्यामुळे कुस्ती क्षेत्रातील मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेतील विजेत्यांकडे कुस्ती क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेले असते. सर्व गटातील तिसऱ्या क्रमांकासाठीच्या दोन विजेत्यांसाठीच्या लढती पूर्ण झालेल्या आहेत. तर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकासाठीच्या अंतिम लढती गुरुवारी(ता.२७) सकाळी आठ वाजता कारखाना साईटवरील गोडाऊन नंबर चारमध्ये होणार आहेत.याचवेळी बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!