*डी. वाय. पाटील विद्यापीठात* *डिझाईनच्या नव्या पर्वाला सुरुवात* स्कूल ऑफ डिझाइनच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

Spread the news

*डी. वाय. पाटील विद्यापीठात*
*डिझाईनच्या नव्या पर्वाला सुरुवात*

­

 

स्कूल ऑफ डिझाइनच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

  •  

तळसंदे
डिझाईन हे भविष्यातील महत्त्वाचे आणि व्यापक करिअर क्षेत्र असून यामध्ये करिअरच्या अमर्याद संधी असल्याचे प्रतिपादन डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ संधीचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी केले. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिझाइनच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि इंडक्शन प्रोग्राम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मध्य प्रदेश सरकारचे पर्यटन विषयक तांत्रिक सल्लागार आणि ट्रायबल आर्ट चे प्रणेते, ज्येष्ठ कलाकार गुरुदत्त काटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यापीठाचे डॉ. एक. के. गुप्ता,गुरुदत्त काटे, कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत, कॅम्पस संचालक डॉ. एस. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कला, संस्कृती, तंत्रज्ञान, प्रयोगशीलता आणि प्रत्यक्ष अनुभव यांची सांगड घालत आयोजित करण्यात आलेल्या या आठवडाभराच्या इंडक्शन प्रोग्रामध्ये विद्यार्थ्यांच्या डिझाईन प्रवासाला सर्जनशील आणि प्रेरणादायी सुरुवात झाली आहे.

यावेळी डॉ. गुप्ता यांनी डिझाईन क्षेत्रातील वाढत्या संधी आणि भविष्यातील करिअरच्या विविध शक्यतांवर प्रकाश टाकला. पश्चिम महाराष्ट्रात स्कूल ऑफ डिझाईन सुरू करण्यामागील विद्यापीठाची दूरदृष्टी स्पष्ट करताना, डिझाईन हे भविष्यातील महत्त्वाचे आणि व्यापक करिअर क्षेत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करून नव्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठ व स्कूल ऑफ डिझाईन मध्ये स्वागत केले.

प्रमुख पाहुणे काटे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय पारंपरिक कला, आदिवासी कला, हस्तकला आणि वस्त्रकलेच्या समृद्ध परंपरेची ओळख करून दिली. पारंपरिक कलांचा आधुनिक टेक्सटाईल, फॅशन आणि उत्पादन डिझाईनमध्ये कसा उपयोग करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

 

यावेळी विद्यार्थ्यांसाठी ब्लॉक प्रिंटिंग व पारंपरिक कलांवर आधारित प्रत्यक्ष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः ब्लॉक प्रिंटिंगचा अनुभव घेत विविध डिझाईन्स विकसित केली. ही कार्यशाळा २५ ऑगस्ट रोजीही सुरू राहणार आहे. दरम्यान २७ ऑगस्ट रोजी आयआयटी व एनआयडी शी संबंधित प्राध्यापक श्री. गंगाधरन मेनन यांचे व्हिज्युअल कम्युनिकेशन विषयावर मार्गदर्शन व संवाद सत्र होणार आहे. तसेच २८ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांसाठी संग्रहालय भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.

विभागप्रमुख नचिकेत बाविस्कर आणि नितीन वारे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेहनत घेतली. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा. शारोन काळे, प्रा. श्रावणी गिरी गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

तळसंदे: गुरुदत्त काटे यांचे स्वागत करताना डॉ. ए. के.गुप्ता. समवेत डॉ. जयेंद्र खोत, डॉ. एस. बी. पाटील.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!