मजूर संघावर छत्रपती शाहू सहकार विकास आघाडीचा झेंडा; ‘कपबशी’चा दणदणीत विजय

Spread the news

मजूर संघावर छत्रपती शाहू सहकार विकास आघाडीचा झेंडा; ‘कपबशी’चा दणदणीत विजय

­

 

 

  •  

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ मर्या.च्या पंचवार्षिक निवडणुकीत छत्रपती शाहू सहकार विकास आघाडीने राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीला धक्का देत सर्वच्या सर्व उमेदवार विजयी करून संघावर एकहाती सत्ता मिळवली. ‘कपबशी’ या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या आघाडीच्या उमेदवारांना सभासदांनी स्पष्ट कौल दिला. विशेष म्हणजे, संघाच्या कारभाराविरोधात उभारलेल्या न्यायालयीन लढ्यानंतर झालेल्या या निवडणुकीकडे छत्रपती शाहू सहकार विकास आघाडीची परीक्षा म्हणून पाहिले जात होते. त्यात सभासदांनी विकास आघाडीच्या बाजूने कौल देत निकालातून आपली भूमिका स्पष्ट केली.

संघाच्या मागील कारभाराबाबत संचालक मंडळातील बहुसंख्य संचालकांनी राजीनामे दिल्याने संचालक मंडळ अल्पमतात आले होते. कोरमअभावी संघाचे कामकाज ठप्प झाल्याचेही संबंधित निवेदनात नमूद करण्यात आले होते. तसेच कामवाटपातील कथित पक्षपात, काही संस्थांना प्राधान्य, आर्थिक व्यवहारातील पारदर्शकतेचा अभाव आणि संचालकांना विश्वासात न घेता निर्णय घेण्यासारख्या मुद्द्यांवर आक्षेप नोंदविण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर संघाच्या कारभारा विरोधात छत्रपती शाहू सहकार विकास आघाडीने न्यायालयीन मार्गाने लढा दिला. न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आणि ५ सप्टेंबर रोजी मतदान झाले. या निवडणुकीत निवडणुकीत ३०३ पैकी ३०१ मतदारांनी मतदान केले.
सभासदांनी विकास आघाडीच्या भूमिकेला साथ देत ‘कपबशी’वर विश्वासाची मोहोर उमटविली.

छत्रपती शाहू सहकार विकास आघाडीच्या निवडणूक लढतीचे नेतृत्व सुरेश नलवडे,ॲड.शाहू काटकर, जयसिंग पाटील,उदय जोशी यांनी केले. न्यायालयीन लढ्यापासून निवडणुकीच्या नियोजनापर्यंत आघाडीला एकसंध ठेवत त्यांनी संघाच्या कारभारात बदल घडवून आणण्याची भूमिका मांडली. पारदर्शक कारभार, समान कामवाटप, आर्थिक शिस्त आणि प्रत्येक सभासदाचा सन्मान या चार प्रमुख मुद्द्यांवर आघाडीने आपली भूमिका सभासदांसमोर मांडली.

दुसरीकडे, राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या निवडणूक रणनीतीचे नियोजन माजी चेअरमन मुकुंद पवार व प्रमोद पोवार यांनी केले. त्यामुळे या निवडणुकीत ॲड. शाहू काटकर सुरेश नलवडे,विरुद्ध मुकुंद पवार ,प्रमोद पोवार अशी नेतृत्वाचीही प्रतिष्ठेची लढत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, निकालात शाहू सहकार विकास आघाडीने बाजी मारत परिवर्तन आघाडीला स्पष्ट धक्का दिला.

‘सभासदांचा संघ, सभासदांसाठी’चा नारा

शाहू सहकार विकास आघाडीने सभासदांसमोर ‘सभासदांचा संघ, सभासदांसाठीच’ हा विचार मांडला होता. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या कामांचे न्याय्य व पारदर्शक वाटप, कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करणे, आर्थिक व्यवहारात पारदर्शकता, संचालक मंडळात सामूहिक निर्णयप्रक्रिया, सभासद संस्थांशी थेट संवाद आणि संघाच्या आर्थिक बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प आघाडीने व्यक्त केला होता मजुरांच्या हाताला काम आणि सभासदांच्या संस्थेला समान न्याय” हा केंद्रबिंदू ठेवून संघाचा कारभार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे या निवडणुकीतील विजयाकडे केवळ राजकीय सत्तांतर म्हणून नव्हे, तर संघाच्या कारभारात पारदर्शकता अशी अपेक्षा व्यक्त करणारा सभासदांचा कौल म्हणून पाहिले जात आहे.

विजयी उमेदवार
सर्वसाधारण प्रतिनिधी :
१. जोशी उदय नारायण — (मते : _____)
२. पाटील जयसिंग आनंदराव — (मते : _____)
३. नलवडे भीमराव शेटिबा — (मते : _____)
४. काटकर शाहू लक्ष्मण — (मते : _____)
५. पाटील तुकाराम धोंडीराम — (मते : _____)
६. कदम सुभाष मारुती — (मते : _____)
७. तोडकर जयहिंद विष्णू — (मते : _____)
८. पाटील कृष्णात आनंदराव — (मते : _____)
९. पाटील राहुल आप्पासो — (मते : _____)
१०. साळोखे रमेश विठ्ठलराव — (मते : _____)
११. पाटील यशवंत विठ्ठल — (मते : _____)
१२. चौगले बाबूराव ईश्वर — (मते : _____)
१३. कोळी महादेव रंगराव — (मते : _____)
महिला प्रतिनिधी :
१. पाटील वसुंधरा वसंत — (मते : _____)
२. मोरे कीर्ती राजेश — (मते : _____)
इतर मागास वर्गीय प्रतिनिधी :
१. पाटील महादेव निवृत्ती — (मते : _____)
२. पाटील युवराज रघुनाथ — (मते : _____)
भटक्या व विमुक्त जाती/जमाती प्रतिनिधी :
१. पोवार तानाजी बाळू — (मते : _____)
अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी :
१. कांबळे विठ्ठल दत्तात्रय — (मते : _____)

 

राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचे उमेदवार
सर्वसाधारण प्रतिनिधी :
आवळे राहुल बाबुराव, करंबे शिरीष शरद, गाडीवडर नागेश हुलगाप्पा, धोत्रे लक्ष्मण ज्ञानू, पाटील भरमाजी कृष्णाजी, पोवार अविनाश लक्ष्मण, पोवार कृष्णात हणमंत, पोवार प्रणवकुमार लक्ष्मण, पोवार मुकुंदराव शामराव, पोवार संदीप बाळासाहेब, यादव विशाल आनंदा, साळोखे भालचंद्र ज्ञानदेव, सांगावकर सदाशिव तातोबा आणि हसूरे राजाराम तिम्मा यांचा समावेश आहे.
अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी :
निंबाळकर अरुण मारुती
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी :
गोधडे बाजीराव ईश्वरा
भटक्या जाती-विमुक्त प्रतिनिधी :
पोवार प्रमोद मुकुंदराव
महिला प्रतिनिधी :
पोवार शारदा सुरेश आणि शिंगाडे शर्मिला अवधुत


Spread the news

You may also like

error: Content is protected !!