साखरेची एम.एस.पी. ५१ रुपये व एफ.आर.पी. ४५०० रुपये या पदवीधर मित्रच्या मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार – मुख्यमंत्री

Spread the news

साखरेची एम.एस.पी. ५१ रुपये व एफ.आर.पी. ४५०० रुपये या पदवीधर मित्रच्या मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार – मुख्यमंत्री

मुंबई – ऊस शेतीबरोबरच साखर उद्योगाला ऊर्जित अवस्था येण्यासाठी पदवीधर मित्रच्या मागणीप्रमाणे सध्याच्या साखरेच्या एम.एस.पी. मध्ये २० रुपयांची वाढ करून ती ५१ रुपये करणे तसेच केंद्र सरकारने चालूवर्षी जाहीर केलेल्या ३६५० रुपयांच्या एफ.आर.पी. मध्ये ८५० रुपयांची वाढ करून ती ४५०० रुपये करणे, यासह साखर उद्योगाबाबतच्या इतर मागण्यांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरच पाठवला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे याबाबत भेटलेल्या शिष्टमंडळास दिले.

­

 

कोल्हापूरचे पालकमंत्री आ. प्रकाश आबिटकर, आ. चंद्रदीप नरके, आ. अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पदवीधर मित्रचे अध्यक्ष माणिक पाटील-चुयेकर यांनी याविषयी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी नुकतीच भेट घेतली.

  •  

साखर उद्योगाबाबत माणिक पाटील यांनी चुये ता. करवीर जि. कोल्हापूर येथे सर्व प्रमुख शेतकरी संघटना, साखर कारखानदार व सर्व पक्षीयांना प्रथमच एका व्यासपीठावर आणून, गेल्या जूनमध्ये सलग आठ दिवसांचे आमरण उपोषण केले होते. शेतकरी व साखर कारखानदार यांचे या उपोषणाच्या निमित्ताने प्रथमच एकवाक्यता झाल्याने, याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी घेतली होती. त्या अनुषंगानेच त्यांनी याबाबतच्या शिष्टमंडळास भेटीस बोलावले होते.

गोरगरीब दारिद्र्यरेषेखालील जनतेला साखरेच्या दरवाढीचा फटका बसू नये म्हणून, साखरेचा दर दुहेरी ठेवण्याचा प्रस्ताव असून, गोरगरीबांना पूर्वीच्याच दराने शासकीय रेशन व्यवस्थेद्वारे साखर वितरित करण्याचे नियोजन आहे. सदरचा प्रस्ताव व्यवस्थितपणे तयार करून तो तातडीने केंद्र सरकारला पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी सहकार सचिव प्रविण दराडे यांना यावेळी दिल्या.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!