गोकुळच्या अंतिम मतदार यादीवर पुन्हा न्यायालयीन टांगती तलवार! अवसायानातील 492 संस्थांच्या समावेशा विरोधात श्रीराम दूध संस्थेची सर्वोच्च न्यायालयात धाव पात्र संस्थेच्या बाजूने लढणार- आमदार सतेज पाटील

Spread the news

गोकुळच्या अंतिम मतदार यादीवर पुन्हा न्यायालयीन टांगती तलवार!

­

 

अवसायानातील 492 संस्थांच्या समावेशा विरोधात श्रीराम दूध संस्थेची सर्वोच्च न्यायालयात धाव

  •  

पात्र संस्थेच्या बाजूने लढणार- आमदार सतेज पाटील

कोल्हापूर- कोल्हापूर सर्किट बेंच व विभागीय उपनिबंधक यांनी अवसायनातील 492 संस्था पात्र ठरविल्या होत्या. या संस्थांचा गोकुळच्या अंतिम मतदार यादीत समावेशही झाला. या निर्णयाविरोधात आता इस्पुर्ली येथील श्रीराम दूध संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संस्थेच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. आमदार सतेज पाटील यांनी पात्र दूध संस्थांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्याची तयारी केली आहे. संस्थांच्या वतीने ॲड. आनंद लांडगे बाजू मांडणार आहेत.

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकी भोवतीचे न्यायालयीन वाद काही केल्या संपेना झाले आहेत. इस्पुर्ली (ता. करवीर) येथील श्री राम दूध संस्थेने राज्य शासनाच्या सहकार विभागाविरोधात विशेष अनुमती याचिका शुक्रवारी दाखल केली आहे. या याचिकेमुळे गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेत नवा ट्विस्ट निर्माण झाला असून याचिकेचा निवडणुकीवर काय परिणाम होणार हे लवकर स्पष्ट होईल.

गोकुळची निवडणूक प्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या विविध न्यायालयीन सुनावणीमुळे चर्चेत आली आहे. आत्ता गोकुळचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून मंगळवारपासून (दि.15) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. याच दरम्यान इस्पुर्ली येथील श्री राम दूध संस्थेचे सदस्य रजनीकांत चेंडके यांनी महाराष्ट्र शासन आणि अन्य संबंधित विभागाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे अवसयानातील सुमारे 492 संस्था पुन्हा न्यायालयीन कचाट्यात सापडल्या आहेत. मात्र या दूध संस्थांचे अंतिम मतदार यादीतील स्थान कायम ठेवण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी देखील पात्र संस्थांना पाठबळ देत सर्वोच्च न्यायालयात संस्थांच्या वतीने वकील देऊन बाजू मांडणार आहेत. या याचिकेची सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून मंगळवारी सुनावणीची तारीख मिळण्याची शक्यता आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!