कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन
कोल्हापूर : कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने दरवर्षी केएमए कॉन २०२६ या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन हॉटेल सयाजी येथे करण्यात आले आहे. या परिषदेची व्याप्ती मोठी असून या ही परिषद कोल्हापुरात दिनांक २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.
अशी माहिती कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.ए .बी पाटील,परिषदेच्या अध्यक्षा डॉ. गौरी साईप्रसाद, परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. संदीप पाटील आणि सचिव डॉ.अर्जुन अडनाईक, खजानीस डॉ. प्रवीण नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अवघा रंग एक (One Community , One Vision) या ब्रीदवाक्यावर आधारित या परिषदेकरता मुंबईतील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.अनंत जोशी हे ‘ स्पोर्ट्स मेडिसीन आणि इजा वीरहित व्यायाम’ या विषयावर आणि मुंबई येथील योग तज्ञ रूपा चक्रवर्ती ” योग ” विषयावर लोक जनजागृती पर व्याख्यान
देणार आहे. सदर कार्यक्रम रविवारी सायंकाळी पाच वाजता हॉटेल सयाजी येथे होणार आहे.
परिषदेचे उद्घाटन शनिवारी दिनांक २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता होणार असून अतिरिक्त पोलीस महासंचालक बेंगळुरू येथील हेमंत निंबाळकर आणि सोलापूरचे नामांकित हृदयरोग तज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.परिषदेमध्ये ए आय वर्कशॉप आणि विविध व्याख्यानांमार्फत तज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. मुंबईतील नामांकित डॉ. रॉय पाटणकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. केएमएच्या वतीने दिला जाणारा डॉ.अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पोटविकार तज्ञ डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम रविवारी दुपारी बारा वाजता होणार आहे.दरम्यान परिषदेत गर्भावस्थेपासून बालपणापर्यंत कोणती काळजी घ्यावी,संधिवात, मधुमेहामधील आहार, यकृताचे आजार , राष्ट्रीय अतिदक्षता विभागाचा कोल्हापूरमध्ये विकास,स्तंभन दोष,चष्म्यातून मुक्ती, रक्तविकार, मेंदूविकार अशा अनेक विषयांवर चर्चा आणि तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
परिषदेस देशभरातून ६०० डॉक्टरांची उपस्थिती असणार आहे.पत्रकार परिषदेस खजनीस डॉ. प्रविण नाईक,डॉ. दिलीप पाटील,डॉ. आर.एस. पाटील,डॉ. विजय गावडे,डॉ. अश्विनी पाटील आदी उपस्थित होते.



